इंदापूर: दि.१०ऑक्टोबर रोजी तहसीलदार इंदापूर यांच्या दालणामध्ये पुणे सोलापूर हायवेवरील सरडेवाडी टोल नाका तोडफोड आंदोलन संदर्भात बैठक आयोजीत केली होती.या बैठकीला इंदापुरचे तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब,इंदापुर पोलीसस्टेशनचे API माने साहेब,सरडेवाडी टोल नाका तोडफोड आंदोलनाचे आयोजक रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे,NHAI चे आवटे,टोल प्रशासनाचे अधिकारी व परीसरातील वाहन मालक-चालक, व्यवसायिक,उपस्थित होते.या आयोजीत बैठकीमध्ये उपस्थित केलेल्या काही मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली तर काही मुद्यांवर वादळी चर्चा झाली.दरम्यान खालील मुद्दे टोल प्रशासनाणे मान्य केले आहेत.
👉 मान्य केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
१.टोल परिसरातील स्थानिक युवकांच्या चहाच्या स्टॉलवरील कारवाई त्वरित थांबविण्यात यावी.
२.हॉटेल गोकुळ हिंगणगाव,लोणी देवकर,सिनारमास कंपनी व अन्य अपघातप्रवण क्षेत्रामध्ये अपघातीक्षेत्र असलेले फलक व C.C.tv कॅमेरे बसवण्यात यावेत.३.टोल हद्दीतील सर्व कॅमेरे सुरू करण्यात यावेत.व ज्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात यावेत. ४.टोल हद्दीतील रोडवर ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे.तसेच सर्विस रोड डांबरीकरण करण्यात यावे.
५.टोलवर स्थानिक युवकांना प्राधान्याने नोकरी द्यावी.बाहेरच्या कामगारांमुळे अनेक अडचणी त्याठिकाणी निर्माण होतात.
६.गोकुळ हॉटेल हिंगणगाव येथे अपघाताचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा पर्यायी व्यवस्था करावी तसेच त्या ठिकाणी हायमास्ट दिवा व कॅमेरे बसवण्यात यावेत.
७.टोल हद्दीतील सर्व सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्यात यावे सर्व गटारी स्वच्छ करण्यात याव्यात डिव्हायडर मधील झाडांची कटिंग वेळेत करावी.
८.हिंगणगाव येथील शौचालय सुरू करुन त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरविण्यात यावेत.
९.टोल हद्दीमध्ये अपघात झाल्यानंतर ज्या सुविधा अपघातग्रस्तांना तत्काळ मिळायला पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत त्या लवकर मिळाल्या पाहिजेत.
१०.टोल नाक्यांवरील ऍम्ब्युलन्सवर जे कर्मचारी काम करतात त्यांच्या पात्रतेची प्रमाणपत्र चेक करणे.
११.अपघात घडल्यानंतर प्राथमिक उपचार मिळण्यासाठी टोल प्लाझा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉक्टर नियुक्त करणे .
१२.टोलवरील गर्दी कमी करण्यासाठी टोलवरील कामगार वाढवणे आवश्यक आहेे.१३.टोल मधील एक लेन स्थानिक नागरिकांसाठी वेगळी ठेवावी.
१४.टोल हद्द लांब असल्याने अपघात प्रमाण पाहता उपलब्ध असलेली एक एॅम्ब्युलन्स कमी पडत आहे तर अजुन एक आवश्यक आहे तसेच फायर ब्रिगेड उपलब्ध सध्या नाही ते उपलब्ध करून देण्यात यावे
१५.टोल हद्दीमध्ये रस्ता खराब असल्याने किंवा खड्ड्यांमुळे किंवा रोड च्या कोणत्याही चुकीच्या नियोजनामुळे अपघात झाल्यास टोल प्रशासनाला त्या मध्ये आरोपी करावे.
वरील सर्व मागण्या शनिवार पर्यंत कार्यवाही करुन सुरु केल्या जातील अशी टोल प्रशासनाणे ग्वाही दिली.यामध्ये टोलपासून २० किलोमीटर अंतरावरील स्थानिक सर्व वाहनांना जुन्या टोल नियमानुसार ३० रुपयांनध्ये टोल पास देण्यात यावे. या विषयावर वादळी चर्चा झाली.यावर NHAI व टोल प्रशासनाने वरीष्ठ पातळीवर चर्चा करुन शनिवारपर्यंत निर्णय घेवून कळवु असे आश्वासित केले आहे.बैठक संपण्या आगोदर पुणे सोलापूर हायवेवरील सरडेवाडी टोल नाका तोडफोड आंदोलनाचे आयोजक रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे यांनी तहसीलदार मा.श्रीकांत पाटील साहेब यांना टोल प्रशासनासमोर सांगितले स्थानिक वाहने विनाशुल्क सोडावी अशी आमची मागणी होती परंतु चर्चेदरम्यान आम्ही 30 रु लोकल पास घ्यायला तयार आहोत यापेक्षा आम्ही जास्त देणार नाही आणि तुम्ही जास्त मागत असाल तर आम्ही टोल नाका तोडफोड आंदोलन हे सर्व नागरिकांना भुमिपुत्रांना सोबत घेऊन करणारच अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.येणाऱ्या शनिवार पर्यंत टोल प्रशासनाने वेळ मागितला आहे.मान्य केलेल्या मागणीनुसार कार्यवाही नाही केली तर सरडेवाडी टोल नाका तोडफोड आंदोलन सर्व भुमीपुत्रांना सोबत घेऊन अधिक आक्रमकपणे करणार अशी संजयभैय्या सोनवणे यांनी माहिती दिली.
Home Uncategorized सरडेवाडी टोल तोडफोड आंदोलन संदर्भात तहसीलदारांची मध्यस्थी पण काही मागण्या मान्य तर...