समता सैनिक दल या सामाजिक संघटनेच्या नूतन वर्षासाठीचे मोफत १००० कॅलेंडर प्रकाशन संपन्न

दि. २५/१२/२०२२ रोजी सालाबाद प्रमाणे विश्वरत्न, बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ मार्च १९२७ साली स्थापित केलेले समता सैनिक दल या राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटनेचे नूतन वर्षासाठी मोफत १००० कॅलेंडर प्रकाशन सोहळा रविवारी दुपारी १२:०० वाजता शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी शहरातील नामवंत डाॅ. अविनाश पानबुडे, डाॅ. अनिल शिर्के-पुंढे, डाॅ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरिक्षक मा. प्रकाशजी पवार साहेब, राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ मार्गदर्शक मा. साथी सलिम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रथम समता सैनिक दलाच्या सैनिकांची सामुदायीक प्रार्थना घेऊन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ यांनी प्रस्तावना वाचून आम्ही समता सैनिक दलाच्या वतिने सलग दुस-या नूतन वर्षामध्ये कॅलेंडर प्रकाशन करण्याचा हा हेतु आहे कि, विश्वरत्न, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली स्थापित केलेलं राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटन हे घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे आणि “गांव तिथे शाखा घर तिथे सैनिक” हिचं बाबासाहेबांची संकल्पना होती. हे मनोगत व्यक्त केले
यावेळी प्रमुख पाहुणे डाॅ. अविनाश पाणबुडे यांनी सन. १९१६ पासुन ते आजपर्यत आंबेडकरी चळवळीचा आणि समता सैनिक दल, या सामाजिक संघटनेच्या इतिहासाचे दाखले देत समता सैनिक दल हे राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना का स्थापित कराव लागलं याचं सविस्तर मुद्देसुद मार्गदर्शन केले.
इंदापूर पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरिक्षक मा. प्रकाशजी पवार साहेब म्हणाले कि, संपुर्ण देशातील समता सैनिक दल हे अतिशय उत्कृष्ठ अशी कामगीरी करीत असुन या पुढेही असेचं विविध प्रकारचे उपक्रम राबवुन बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचवण्याचं कार्य करत राहावे अश्या महत्वाच्या सुचना व्यक्त करुन समता सैनिक दल व कार्यकर्त्याचं कौतुक केलं.
डाॅ. अनिल शिर्के-पुंढे यांनी आपल मनोगत व्यक्त केलं कि समता सैनिक दल या संघटनेची कामगीरी हि कौतुकास्पद आहे. जिल्हाध्यक्ष आणि मी किमान बारा-तेरा वर्षा पासूनचे मित्र तर आहोतचं पण या संघटनेच्या सदस्यांच्या अथवा संबंधीत कार्यकर्त्याना जे जे उपचारादरम्यान सहकार्य करता येईल ते निस्वर्थपणे करु असे स्पष्ट केले.
या वेळी राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ मार्गदर्शक साथी सलिम शेख यांनी समता सैनिक दलाचा कार्यकर्ता हा काल, आज, आणि उद्या कसा असावा व आज २५ डिसेंबर १९२७ साली महाड येथे सहस्त्र बुद्धे नांवाच्या व्यक्तीच्या हस्ते मनुस्मृति दहन करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे असे मार्गदर्शन साथी सलिम शेख यांनी केले.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे (आरोग्य विभाग) मा. उपअधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी समता सैनिक दल या सामाजिक संघटनेच्या युवकांना अवहाण केले कि या चळवळीमध्ये जास्तितजास्त तरुणांनी सहभागी होऊन विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
समता सैनिक दलाचे पुणेजिल्हा कायदेशिर सल्लागार अँड. जे.एन. पोळ हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर या कार्यक्रमाचे सुत्र संचलन संघटनेचे कार्याध्यक्ष शामराव जाधव व संकल्प मानव ट्रस्टचे संस्थापक मा. संतोषजी जामदार यांनी केले.
यावेळी समता सैनिक दलाचे पुणेजिल्हा – अध्यक्ष अशोकराव पोळ यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अंबादास रणदिवे, तालूका उपाध्यक्ष – शशीकांत गायकवाड, सुर्यकांतजी चव्हाण सर – तालूका संपर्क प्रमुख, जयसिंग जाधव तालूका जेष्ठ सल्लागार, लव्हू पोळ, शिवाजी (नाना) पोळ, मेजर ज्ञानेश्वर खंडागळे, मेजर भजनदास गायकवाड, मा. नगरसेवक गफ्फार बेपारी, अजित मिसाळ, जितेंद्र मिसाळ, पर्बत कांबळे, राजेंद्र कळसाईत, दादा मिसाळ, अरुण शिंदे, मैनुद्दीन गोरख (दादा) कदम, नंदू खंडाळे, गणेशराव गार्डे,अदी तमाम समता सैनिक उपस्थित होते…

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here