समाजातील सर्वचं घटकांना संघर्षासाठी एकत्र करुन समता प्रस्थापित करणे हेचं “समता सैनिक दलाचे” ध्येय-अशोकराव पोळ

इंदापूर: दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२ : ०० वाजता बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, शिवछत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधुन शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी समता सैनिक दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अशोकराव पोळ यांच्या अध्यक्षतेखाली इंदापुर तालूक्याच्या नुतन कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.
यामध्ये इंदापूर तालुक्यामधील विविध गांवातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या नूतन कार्यकारणीच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी सन्मानिय तानाजी मोरे (मा.सुभेदार ), इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी शशिकांत गायकवाड, तालुका सचिव संकेत चितारे, संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी अॅडव्होकेट जयप्रकाश नारायण पोळ साहेब, तालुका संपर्कप्रमुख म्हणून सूर्यकांत चव्हाण, तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी शामराव जाधव, तर संघटनेच्या ज्येष्ठ मार्गदर्शक पदी जयसिंग जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी समता सैनिक दल या सामाजिक संघटनेचा १३ मार्च २०२२ रोजी संपन्न होत असलेला ९५ वा वर्धापण दिन, महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह, (मनुस्मृति दहन )१४ एप्रिलला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला करण्यात येत असलेले संचलन अशा विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेचे पुणेजिल्हा अध्यक्ष अशोकराव पोळ हे कार्यकर्त्याना मार्गदर्शन करत म्हणाले कि समता सैनिक दल हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन.१९२७ साली स्थापित केलेले असुन समता सैनिक दलाची कार्यपद्धत, ध्येय, उद्दिष्ट हि जात, धर्म, वंश, लिंग आणि वर्ग इत्यादीवर आधारलेली विषमता नष्ट करुन स्वतंत्रता आणि समानता या मूल्यावर आधारलेल्या समाजाची निर्मिती करण्याकरिता अनुसूचित जातीजमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, अशा सर्वचं घटकांना संघर्षासाठी एकत्र करुन समता प्रस्थापित करणे हेचं समता सैनिक दलाचे ध्येय आणि उद्दिष्ट असुन याचे तालुक्यातील प्रत्येक नूतन पदाधिकाऱ्याने आचरणं करणे गरजेचे आहे.समता सैनिक दल या संघटनेची रचना गांव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक निर्माण व्हावे हिचं बाबासाहेबांची संकल्पना होती बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा त्याग नजरेसमोर ठेऊन प्रत्येक पदाधिका- यांनी सामाजिक कार्य करावे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संकेत चितारे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी पार पाढण्यासाठी भाऊसाहेब झेंडे, दत्तात्रय सावंत, गणेश गार्डे, रमेश क्षिरसागर, संतोष जाधव, राजेंद्र जमदाडे, यांनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here