सभासद, कामगारांची दिवाळी गोड करणार आठ दिवसांत पेमेंट देणार:: राजेंद्र नागवडे नागवडे साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्वाही.

 

श्रीगोंदा (प्रतिनिधी- अजय रंधवे)

श्रीगोंदा:नागवडे साखर कारखान्याचा राज्यात दोन ते तीन नंबर घेण्यासाठी प्रेयत्न सुरु आहेत. एफआरपीप्रमाणे आठ ते दहा दिवसांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पेमेंट वर्ग करण्यात येईल. सभासद व कामगारांची दिवाळी गोड करणार आहे. अशी ग्वाही नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणात राजेंद्र नागवडे बोलत होते. नागवडे म्हणाले, काही मंडळी म्हणतात की साखर विक्री व्यवहारात खूप-तेजी मंदी झाली; पण विरोधक असा भास करतात की साखर कमी भावाने विकली. साखरेचे व्यवहार झाले; पण कमी दराने कुणाला साखर दिली नाही.केशव मगर सांगतात की, बापूंचा कारभार पारदर्शक होता. त्यामध्ये संचालक मंडळात ते उपाध्यक्ष होते. त्यांच संचालकांवर मगर आरोप करतात. त्यामुळे मगरांनी आपण काय आरोप करतो,यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कोणत्याही बँकेचा कर्ज हप्ता नागवडे साखर कारखान्याने थकविला नाही. यापुढे ही हप्ते थकणार नाहीत. त्यामुळे आरोप करणाऱ्या मंडळींनी चिंता करण्याची गरज नाही. असा टोला मारला.
आमदार बबनराव पाचपुते म्हणाले नागवडे साखर कारखान्याचा डिस्टीलरीसह वीजनिर्मिती प्रकल्प सक्षमपणे चालविणे आवश्यक आहे. ऊसाला चांगला भाव देऊन कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी करता येईल. सत्ताधारी संचालक राजेंद्र नागवडे आपण कसा कारभार करतो.यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार म्हणाले, कुकडी घोड पाण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल, तरच पाणी प्रश्न सुटेल
यावेळी केशवराव मगर,आण्णासाहेब शेलार, दिपक भोसले, संदीप नागवडे, प्रा.सुभाष कळसकर,प्रशांत दरेकर, बाबासाहेब भोयटे, स्मितल वाबळे, महेश तावरे, धर्मनाथ काकडे, योगेश भोयटे,हनुमंत झिटे,निळकंठ जंगले, संतोष गुंड, हरिश्चंद्र धांडे, श्रीपाद खिस्ती, बाळासाहेब मगर, गणपत फराटे यांची भाषणे झाली.प्रास्ताविक सुभाष शिंदे यांनी केले. अहवाल वाचन कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी केले. आभार हेमंत नलगे यांनी मानले.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here