सफाळे पोलीस ठाण्यात जप्त केलेली बोट( सेक्शन पंप ) होणार लिलाव

वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हातील जप्त बोट( सेक्शन पंप) लिलाव २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव चौकीच्या आवारात होणार आहे. पालघर न्यायालयाच्या आदेशानुसार लिलाव करून येणारी रक्कम सरकारकडे जमा करण्यात येणार अशी. अशी सूत्रांची माहिती आहे. ज्यांच्याकडे स्क्रॅपचे परवाना आहे त्यांनाच लिलावात सहभाग घेता येईल असे सांगण्यात आले आहे.
तर अनेक रेती व्यवसाय करणारे व कामगारांकडून लवकरात लवकर रेतीचा परवाना मिळावा म्हणून मागणी होत आहे. परवाना नसल्यामुळे संपूर्णपणे रेती उपसा पूर्णतः बंद आहे .त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय सुरू केला तर बोटी जप्त होतात त्यामुळे भीतीचे वातावरण पूर्ण परिसरात पसरले आहे .महसूल विभागाने लवकरात लवकर रेती परवाना द्यावा अशी मागणी रेती व्यवसायिक करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here