वैभव पाटील :प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत पुर्व व पश्चिम भागातील उपकेंद्रात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात येत आहे. तांदुळवाडी येथील उपकेंद्रात गुरुवारी हे अभियान राबवण्यात आले असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत खंदारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सर्व विभागाच्या मदतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबवण्यात येत आहे. दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर या कालावधीत हे अभियान राबवण्यात येत असून आशा वर्कर घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत. शासनाने 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया, आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
राज्यात माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत असले तरी गरोदरपणात महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आढळत असते. ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात तर महिलांच्या आरोग्य तपासणीकडे कुटुंबाकडून बऱ्याचदा दुय्यम स्थान देण्यात येत असते. प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्य सुद्धा सशक्त असेल तर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रीच्या काळात ही योजना राबविण्यात येत आहे. गर्भधारणा पूर्वी आरोग्य सेवा, रोग निदान व उपचार समूपदेशन, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग पडताळणी व उपचार क्षयरोग तसेच इतर संशोधन आजार तपासणी उपचार या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत खंदारे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. नवरात्र उत्सव साजरा होत असताना मातेला दुर्गा माता म्हणुन पुजणार असुन आरोग्य कसे चांगले राहिल हा उद्देश आहे. त्याचप्रमाणे शासनाने दिलेल्या योजनेचा लाभ मोफत दिला जाणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी तपासणी करून लाभ घ्यावा असे आवाहन खंदारे यांनी केले. यावेळी डॉ. मनोज विश्वकर्मा, डॉ. भगवान हाडळ, मनोज पिंपळे आरोग्य सेविका सोनावणे, आशा सेविका, व गरोदर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित सफाळे प्राथमिक आरोग्य विभागामार्फत सुरुवात झाली असून अठरा वर्षे वयोगटापासून पुढे सर्व महिलांनी आपल्या नदीकच्या उपकेंद्रात जाऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी.
➖अभिजित खंदारे
तालुका आरोग्य अधिकारी
Home Uncategorized सफाळेत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान.तांदूळवाडी उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित...