पालघर:(वैभव पाटील :प्रतिनिधी)पालघर तालुक्यातील सफाळे गावाची गाव देवी मानली जाणारी कुर्लाई देवीची जत्रा चैत्र पंचमी शके 1941 म्हणजेच मंगळवारी संपन्न झाली असून पंचक्रोशीतील अनेक गावांमधील नागरिकांनी जत्रेच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सफाळयात पूर्व पार विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहे.संकट असो वा उत्सव देवीच्या जत्रेनिमित्त सर्वजण एकत्र येऊन दर्शन घेतात. ग्रामपंचायत व स्थानिक समिती यांच्या सहकार्याने यात्रोत्सव आनंदाने पार पडत असतो. कुर्लाई देवीची पालखी मंगळवारी सायंकाळी चार वाजता निघाल्यानंतर संपूर्ण दिवसभर यात्रा उत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावर्षी कुलाई देवीच्या यात्रे निमित्ताने रोडखड नाका, नारोडा, ते सफाळे गावापर्यंत दुकाने थाटली होते. त्याचप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर दिवसभर वाहत होता. या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे माहेरवाशींनी यात्रेसाठी एकत्र गावी येत असून जुन्या आठवणीला उजाला देत असतात. सफाळे पोलिसांनीही कुठलाही अनुचित प्रकार घडू म्हणून या यात्रेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सन 1952 पूर्वी कुर्लाई मातेचे वास्तव सरतोडी या ठिकाणी होते. त्यानंतर कै. गोविंद रानडे, विठ्ठल घरत, भाऊ पाटील, माधव पाटील, गोविंद घरत या सामाजिक कार्यकर्त्यांनी सफाळे देवीची मंदिराची उभारणी केली. सुमारे 63 वर्षानंतर 26 मार्च 2008 रोजी जुन्या मंदिराच्या जागी नवीन मंदिराची स्थापना केली. मंदिराच्या परिसरात दोन लहान मंदिरे शौचालय व्यवस्था, स्नानगृह, कमान, बगीच्या इतक्या वास्तु आहेत.