सफाळेतील सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाजाचा अभ्यास दौरा

वैभव पाटील : पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील सफाळेतील सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाजाचा अभ्यास दौरा आयोजन रविवारी दि. 8 जानेवारी रोजी करण्यात आले होते. कुणबी समाजाला एकत्र आणण्यासाठी मुख्य उद्देश असून गेली 11 वर्ष अभ्यास दौरा तथा सहल काढण्यात येते. या आयोजनात गालतरे इको व्हिलेज, केळठण येथील साईबाबा प्रति शिर्डी, वज्रेश्वरी, गणेशपुरी या तीर्थ स्थळांना भेट देण्यात आली होती.
सूर्यवंशी क्षत्रिय समाजोन्नती मंडळ सफाळे काही वर्षापासून सामाजिक कार्यात पुढाकार घेत असून विद्यार्थ्यांचा गुणगौरव ,गुणीजनांचा सत्कार, वृक्षारोपण असे अनेक कार्यक्रम वर्षभरात राबवले जात असतात. कोरोना काळात सुद्धा मास्क वाटप व रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यात मध्ये 54 महिला व पुरुष सहभागी झाले होते. या वेळी महिला व पुरुष मंडळी यांनी अभ्यास दौऱ्या बरोबर मनोरंजन करून आनंद लुटला. यावेळी अध्यक्ष सुरेश शेलार, सरचिटणीस दिवाकर पाटील, विजय पाटील, हरिश्चंद्र वैद्य, बाळाराम पाटील, प्रफुल्ल पाटील,नरेश ठाकूर, अनंत सोगले, प्रदीप पाटील,नितीन पाटील, अजय पाटील, संतोष पाटील,रमाकांत पाटील,रवींद्र घरत,साने,म्हसकर , व कार्यकरणी,‌ विश्वस्त, सदस्य व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here