पालघर तालुक्यातील सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेचे राजगुरू हरेश्वर महादेव पंडित विद्यालय सफाळेच्या मुख्याध्यापकपदी विलास शांताराम पाटील यांची सोमवारी दि. 1 मे रोजी नियुक्ती करण्यात आली. पाटील हे जून 2020 पासून पर्यवेक्षक म्हणून प्रमाणिक पणे काम करत होते. सोमवारी त्यांची मुख्याध्यापक पदी निवड झाल्यानंतर परिसरातून शुभेच्छा वर्षाव केला जात आहे.पाटील हे राजगुरू विद्यालयात 1989 रोजी शिक्षक म्हणून रुजू झाले होते. या विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थ्यांचे सुप्त गुण हेरून त्यांच्यावर पैलू पाडण्याचं काम त्यांनी केले आहे .तसेच शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी सोनोपंत दांडेकर कॉलेज मध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर वसईतील वर्तक कॉलेजला पुढील शिक्षण घेऊन वडाला येथे बीएड शिक्षण घेऊन पूर्ण केल्यावर शिक्षक म्हणून राजगुरू विद्यालयात रुजू झाले होते. मुंबई विद्यापीठामधून अलीकडे त्याने एम ए ची पदवी सुद्धा घेतली आहे.एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.विलास पाटील हे सफाळे पूर्व भागातील लालठाणे गावचे असून काही वर्षांपासून सफाळे येथे राहत आहेत.पाटील यांनी आधी ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीवर संचालक पदी काम केले आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण संघटनेवर काम केले आहे.