महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब रुपनवर आणि मंडळ कृषी अधिकारी श्री.गणेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली मौजे अवसरी मधील शिवाजीनगर येथे दि. 21 नोव्हेंबर रोजी क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाच्या महिलांच्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या शेती शाळेला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.यावेळी उपस्थित महिलांना एकात्मिक पीक व्यवस्थापन संकल्पना ,मृद परीक्षण, जमीन आरोग्य पत्रिका यावरून खत व्यवस्थापन तसेच हरभऱ्यावरील मर रोगविषयक माहिती आणि हरभऱ्यावरील विविध रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयी कृषी सहाय्यक अनुपमा देवकर यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली.उपस्थित महिलांना शेतकरी उत्पादक कंपनी व प्रधानमंत्री खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी माहिती देण्यात आली.या शेतीशाळेत प्रगतशील शेतकरी श्री.योगेश पवार यांनी महिलांना पेरू लागवडविषयी मार्गदर्शन केले.या शेती शाळेसाठी महिला शेतकरी आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.यावेळी ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच सदर शेतीशाळेत सांघिक खेळ याचे आयोजन करण्यात आले होते. सांघिक खेळामुळे गट क्रियाशील व एकजूट राहण्यासाठी उपयोग होतो.तसेच सांघिक खेळाद्वारे पीक उत्पादन तंत्रज्ञान याविषयीचा संदेश दिला जातो. एकंदरीतच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी श्री.भाऊसाहेब रुपनवर आणि मंडळ कृषी अधिकारी श्री.गणेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या महिलांविषयीच्या शेती शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले लागला आहे अशी माहिती कृषी सहाय्यक अनुपमा देवकर यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना दिली.
Home Uncategorized सकारात्मक बातमी:अवसरीत कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या महिलांच्या शेती शाळेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद.