इंदापूर:छत्रपती संभाजी राजे करत असलेल्या आझाद मैदान येथील अमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सकल मराठा समाज इंदापूर शहर व तालुक्याच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तहसील ऑफिस इंदापूर समोर करण्यात येणार असून यात खालील मागण्यांचा समावेश आहे:-
1) मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
2) कोपर्डीतील आरोपींना तात्काळ फाशीची शिंक्षा व्हावी.
3) मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या.भोसले समितीने केलेल्या शिफारशींची अमलबजाणी करण्यास तत्काळ सुरुवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरु करावी.
4) ईसीबीसी व एसर्ईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या,पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे,त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.
5) सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे आणिं येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी. 6) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रुपये कर्ज व्याज परतावा हा 25 लाख रुपये करण्यात यावा. महामंडळ व्यवस्थित चालण्यासाठी, प्रशासकिय निर्णय घेण्यासाठी तसेच नविन योजना निर्माण करण्यासाठी महामंडळास संचालक मंडळ असणे गरजेचे आहे.
7) मराठा समाजातील युवकांवर दासल झालेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे
वरील सर्व मागण्या यांच्याकडे शासनाचे लक्ष जावे व त्यातून लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी याकरता सकल मराठा समाज इंदापूर शहर व इंदापूर तालुक्याच्या वतीने उद्या दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत इंदापूर तहसील कचेरीसमोर सकल मराठा समाज इंदापूर शहर व तालुक्याच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याने तालुक्यातील सर्व मराठा समाजातील युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज कमिटीतर्फे करण्यात येत आहे.र