भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आनंद थोरातांनी वाजवला ढोल
जनता एक्सप्रेस मराठी न्यूज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.नं.7776027968
दौंड : भारत देशाच्या वाटचालीमध्ये संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व असून देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या धनगर समाजाच्या चाली-रूढी-परंपरा व संस्कृती अमुल्य आहे. या पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हाव, समाजातील भावी पिढीला पारंपरिक संस्कृतीची माहिती व्हावी या उद्देशाने दौंड तालुक्यातील महेश्वर युथ फाउंडेशन च्या वतीने संस्कृती संवर्धन या कार्यक्रमाचे पाटस(ता. दौंड)येथील मोटेवाडा येथे दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने धनगरी ओव्या, गजी नृत्य, पटका संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषा व धनगर समाजाच्या जुन्या चाली, रिती, रूढी, परंपरा या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली. गेल्या वर्षी देखील येथे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यंदा तालुक्यातील शेकडो समाजबांधवानी येथे हजेरी लावली होती.
पुरातन काळापासून धनगर समाज हा देशातील दऱ्याखोऱ्या मध्ये राहून शेळ्या मेंढ्या पाळून आपली उपजीविका करतो. आपल्या पारंपरिक संस्कृतीचा संवर्धन काही समाज बांधव करत असले तरी आधुनिक काळाच्या ओघात अनेक लोककला, संस्कृती लोप पावत चालल्या आहेत. यामध्ये धनगर समाजाच्या संस्कृतीचा देखील समावेश आहे. त्यामुळे महेश्वर युथ फाऊंडेशनने संस्कृती संवर्धनाच्या माध्यमातून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. चौफुला व पाटस येथील गजनृत्य पथकाने यावेळी आपली कला सादर केली. तसेच तरडे येथील ओवीकारांनी ओव्यांचा कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमासाठी भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात,मरहट्टी संशोधन व विकास मंडळ, पुणे चे अध्यक्ष सुरेश महानवर,पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब तोंडे पाटील , दादासाहेब केसकर, दौलत ठोंबरे, शुभांगी धायगुडे शिगंटे, उद्योजक विठ्ठल कोकरे, दिलीप हंडाळ, अभिषेक थोरात,हरिदास लाळगे, अरुण आटोळे,संदीप गडदे, बाजीराव तालवर, श्रीकांत हंडाळ, महेश गडधे, अण्णा तांबे,विकास गडधे आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक हंडाळ यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल सोडनवर यांनी केले तर आभार संभाजी खडके यांनी मानले.
आनंद थोरातांनी वाजवला ढोल..
संस्कृती संवर्धनाच्या निमित्ताने पाटस येथे तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. यावेळी पारंपरिक गजे ढोल नृत्य सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी ढोल वाजवून साथ दिली.