संविधान चित्रपटाचे आज (रविवारी) बीडमध्ये ऑडिशन

क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंट निर्मित दंडम चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर बीडचे भूमिपुत्र व्ही. सत्तू आता बिग बजेट असलेला संविधान एक वरदान हा हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपट घेऊन येणार आहेत. त्या अनुषंगाने नवोदित कलाकारांसाठी नि:शुल्क ऑडिशन घेतले जाणार आहे. सदरील ऑडिशन बीड शहरातील दि वूमन वर्ल्ड, नगरनका येथे रविवार (ता.२९) रोजी घेतले जाणार आहे. तरी या नि:शुल्क ऑडिशनसाठी नवोदित “ कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंटचे प्रमुख तथा चित्रपटाचे निर्माता व्ही. सत्तू यांनी केले आहे. करिअरच्या टप्प्यावर कोणतेही काम अथवा एखादी कलाकृती उभा करणे साधी गोष्ट नाही. त्यासाठी अथक संघर्ष आणि कष्ट उपसावे लागतात. त्यानंतरच त्या व्यक्तीला लौकिक व मान सन्मान मिळत राहतो. चित्रपट बनविण्याचे कोणतेही शिक्षण नसताना चित्रपट बनविणे व तो रिलीज करणे मोठे आव्हानात्मक काम आहे. मात्र असे असताना दंडम सारखा बिग बजेट ऐक्शनचित्रपट प्रदर्शित करून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणारे व्ही. सत्तू आता अतिशय महत्वाचा विषय घेऊन संविधान एक वरदान नावाचा चित्रपट बनवीत आहेत. त्या चित्रपटाचे नाव आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतले मोठं-मोठे कलाकार घेऊन संविधान हा चित्रपट मेकिंग केला जाणार आहे. या चित्रपटासाठी ऑडिशन घेऊन नवोदित कलाकारांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे ऑडिशनसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंटचे प्रमुख तथा चित्रपटाचे निर्माता व्ही.सत्तू यांनी केले आहे. काही अडचण असल्यास व्हाटसअप क्रमांक ९५६१३६८६३७ तर कॉलसाठी९२२६४८१७२८, ९५६३३ ०७३०७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंटकडून जनता एक्सप्रेस मराठी न्युज मार्फत करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here