इंदापूर: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठीचा लढा पुऱ्या महाराष्ट्रात चालू आहे. ‘काहीही झालं तरी पेन्शन मिळायलाच पाहिजे’.यासाठी सुमारे 18 लाख कर्मचारी बांधवांनी एकत्र येऊन संपाद्वारे आपला लढा उभा केला आहे.आज जिल्हा परिषद पुणे ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे विराट मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते.
या सर्व घडामोडी मध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडून पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शेतकरीही चिंतेत आहे ही बाब ओळखून इंदापूर तालुक्यातील कृषी सहाय्यक गणेश भोंग हे मात्र संपात सामील न होता इंदापूर तालुक्यात राहून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पंचनामे यांच्या कामांमध्ये मग्न असलेले दिसून आले. शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा असून शेतकऱ्याच्या आर्थिक प्रगतीवर देशाची आर्थिक प्रगती अवलंबून असते याची जाणीव कृषी सहाय्यक गणेश भोंग यांना पूर्ण अवगत असल्याचे या उदाहरणावरून दिसून येते.आज कृषी सहाय्यक भोंग यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला, गावातील शेतकऱ्यांना स्वतः कॉल करून नुकसानीची माहिती घेतली त्याचप्रमाणे जनता एक्सप्रेस मराठी न्यूजची बातमी वाचून तरंगवाडी येथील युवा शेतकरी कृष्णा व्यवहारे यांच्या दोडका प्लॉटवर जाऊन पाहणी करून पंचनामाही केला.अचानक निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांची दाखल खऱ्या अर्थाने घेणाऱ्या अशा कर्मचाऱ्याची महाराष्ट्राला सध्या गरज आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात कृषी सहाय्यक गणेश भोंग यांची चर्चा सर्वत्र असून त्यांचे कौतुकही केले जात आहे.