इंदापूर: व्यक्ती हा दर्जा किंवा जन्माने मोठा किंवा लहान नसतो, तो सद्गुण किंवा कर्माने मोठा किंवा लहान असतो.त्यामुळे कर्म पारदर्शकता ठेवून जगावे या संत रोहिदास महाराजांच्या वचनाचा अवलंब करून समाजात जीवन जगले पाहिजे असे मत माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे म्हणाले.श्री संत रोहिदास महाराज यांची 645 वी जयंती 16.फेब्रुवारी रोजी इंदापूर येथील संत रोहिदास महाराज समाज मंदिर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराजांचे विचार व कार्य समाजाभिमुख व समाजाला योग्य दिशा देणारे होते. त्यांच्या कार्याची शिदोरी आधुनिक पिढीला प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत मा.नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे यांनी व्यक्त केले.संत रोहिदास महाराजांच्या निमित्त डाॅ लक्ष्मण आसबे यांचे प्रवचन यात श्री संत रोहिदास महाराज यांच्याविषयी अत्यंत सुलभ भाषेत प्रबोधन केले.
या कार्यक्रमाच्या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचे बंधू कृषीउत्पन बाजार समिती चे संचालक मधुकर मामा भरणे व शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन मा.भरत शेठ शहा साहेब यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांची आरती करण्यात आली.या वेळी प्रा.पवार मॅडम, गुजर सर, मुख्याध्यापक माने, मा.नगराध्यक्ष सुरेश गवळी, मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,मा.अशोक गानबोटे,मा. उपनगराध्यक्ष राजेश शिन्दे,गटनेते गजानन गवळी, नगरसेवक अनिकेत वाघ,मा.नगरसेवक सुधीर मखरे, व्हायस चेअरमन गटकुळ , योग पंतजली चे प्रमुख अनपट सर, मा. पांडुरंग शिंदे, मदन व्यव्हारे, महादेव लोखंडे,विकास खिलारे,अहमदराज सय्यद व इंदापुर शहरातील सर्व समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन बंडोपंत लांडगे, सुनिल काबळे , शिवम शेवाळे. व्यंकटेश ननवरे.मयुर शेवाळे, ॠषीकेश मोहिते कृष्णा हाराळे,अनिल काबळे संतोष शेवाळे,वैभव सोनवणे,या सर्व कार्यकर्त्यांनी यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.कार्यक्रमाची सांगता करण्या आगोदर इंदापुरचे सुपुत्र खासदार राहुल शेवाळे यांचे वडील कै. रमेश शेवाळे व काश्मीर सीमेवर सैनिक देशसेवा करताना शहिद झाले कै वसंत शेवाळे यांना सर्व समाज बाधवानी श्रद्धांजली अर्पण केली.महाप्रसादा चा कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल काबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. नगराध्यक्ष विठ्ठल अप्पा ननवरे यांनी केले.विशेष सहकार्य प्रवीण ननवरे यांनी केले.