‘संघर्षगाथा ते विधानगाथा’: नेतृत्व एका रात्रीत तयार होत नाही त्यामुळे भाऊंसारख्या नेतृत्वाला जपणे ही समाजाची गरज..

इंदापूर तालुक्याचे लोकनेते शंकररावजी पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा समर्थपणे सांभाळत समाजकारणात, राजकारणात एक सुसंस्कृत, विनयशील, कार्यतत्पर कर्तव्यदक्ष नेता अशी ओळख निर्माण करणारे लोकप्रिय नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब इंदापूरच्या सभेत हर्षवर्धन पाटील साहेबांबद्दल बोलताना म्हणाले होते की, “नेतृत्व एका रात्रीत तयार होत नाही अशा नेतृत्वाला जपणे ही समाजाची गरज असते ” हे अत्यंत महत्त्वपूर्ण वास्तव आहे. नेतृत्त्व जाणकार, दूरदृष्टीचे आणि प्रभावी असेल तरच त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास होणे शक्य आहे. आपल्या कर्तृत्वाने साहेबांनी हे सिद्ध केले आहे.इंदापूरची एम. आय. डी. सी. सिंचनाच्या नानाविध योजना, साखर कारखाने, शिक्षण संस्था, धरणग्रस्ताचे खंडकरी शेतक-यांचे प्रश्न सोडविणे, रस्ते अशा विकास कामांची यादी करू लागली तर विकासगाथा निर्माण होईल असा इंदापूरचा चौफेर विकास साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे, होतो आहे अर्थात विकास ही न संपणारी प्रक्रिया आहे म्हणूनच पुन्हा पुन्हा चांगल्या नेतृत्वाला संधी देणे समाजाचा हिताचे असते.साहेबांचे नेतृत्त्व आणि कर्तृत्व अत्यंत कष्टाने आणि संघर्षाने उभे राहिलेले आहे. हनी हातोड्यांचे लाखो घाव सोसल्यावर दगडाला देवपण येते तसेच अपयशाचे, संघर्षाचे लाखो घाव सोसताना संयमाने हार न मानता सकारात्मकतेने लोकोपयोगी कार्यासाठी, लोकहितासाठी संघर्ष करत राहिल्यामुळेच हर्षवर्धन पाटील साहेबासारखे विनयशील आणि कृतिशील नेतृत्त्व निर्माण झाले आहे. आज हर्षवर्धन पाटील’ ही व्यक्ती राहिलेली नाही तर विचारधारा, विकासधारा बनलेली आहे. हे त्यांच्या नेतृत्वाचे आणि कार्याचे यश आहे.हर्षवर्धन पाटीलसाहेबांचा ‘संघर्ष’ हा स्थायीभाव वाटावा इतका त्यांचा प्रवास संघर्षमय आहे त्यांनी विधानगाथा हा ग्रंथ लिहिला आहे. त्यातून विधीमंडळ कामकाजाची माहिती मिळते, त्याचबरोबर साहेबांचे माणसांशी संवाद साधण्याचे चातुर्य, कल्पकता या गुणांचे दर्शन लडते पण त्यांनी त्यांनी संघर्षगाथा’ एखादया ग्रंथातून मांडली तर लाखो माणसांना लढण्याचे संघर्ष करण्याचे, उभे राहण्याचे बळ प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल साहेबांचा संघर्ष पहाताना तुकारामांच्या ‘रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग” या वचनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. प्रचंड संघर्ष असून देखील हा आमचा नेता डगमगला नाही याचे वर्णन “तेचि म्हणावे दिवे जे वादळातही टिकतात,अंधाराशी झुंजून प्रकाश दयायला शिकवितात”या शब्दात करणे समर्पक होईल. खरोखर साहेबानी असंख्य गोरगरीबाच्या जीवनात आनंदाचे, समाधानाचे, प्रेमाचे विश्वासाचे आर्थीक यांचे दिवे लावलेले आहेत. त्यांच्या जीवनात समाधानाचा प्रकाश पेरलेला आहे.महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना वडीलांचे छत्र हरपले आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली, या वेदनेला पेलत त्यांची वाटचाल सुरू झाली त्यांचा राजकारण, समाजकारणातील प्रवेश आणि संपूर्ण वाटचाल संघर्षमय आहे.कॉलेज निवडणुकांपासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास कारखान्याचे संचालक, आमदार राज्यमंत्री कविनेट मंत्री, संसदीय कार्यमंत्री असा सतत उंचावत राहिलेला असला तरी त्याची सुरुवात १९९५ मध्ये अपक्ष लढ्न जिद्दीने आमदारकी मिळविण्यापासून झालेला आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या पदांच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचा, गोरगरीबांचे अश्रु पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटविलेला आहे.साहेबांची संपूर्ण कारकीर्द अत्यय संघर्षमय आहे परंतु ते एखादा लढवय्या सेनापती सारखे सर्वांना धीर देत स्वतः आघाडीवर राहून लढत असतात. २०१४ चा दुर्दैवी अपघातानंतर खचलेल्या कार्यकत्यांना साहेबांनी पुन्हा धीराने उभे केले आहे.मातोश्री रत्नप्रभादेवी (भाभी) यांच्या जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पण याही प्रसंगी ते त्यांच्यावर पालकत्वाची जबाबदारी असलेल्या तालुक्यातील तमाम कार्यकत्यांना आप्तेष्टांना धीर देत होते. त्यांच्या या जिद्दीला धैर्याला सलाम।अतीव कष्टातूनतून त्यांची विधानगाथा सजलेली साकारलेली आहे. तिचा नवा प्रवास नव्या जिद्दीने नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने लवकरच काही महिन्यांमध्ये पुन्हा सुरू होणार आहे. हा प्रवास खंडीत झाल्यामुळे तमाम तालुक्याने असंख्य झळा सोसल्या आहेत त्यामुळे संपूर्ण तालुकाच साहेबाच्या विधानगाथेच्या नव्या प्रवासाची आतुरतेने वाट पहात आहे आणि या प्रवासाला आपला हातभार लावण्यास सज्ज झाला आहे. साहेबांना वाढदिवसासाठी आणि ‘विधानगाथेच्या’ नव्या प्रवासासाठी कोटी कोटी हार्दीक शुभेच्छा!

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here