श्री हनुमान विद्यालय अवसरी मध्ये आज पहिल्याच दिवशी उत्साहात सर्व मुला-मुलींनी शाळेत हजेरी लावली. नवीन वर्ग, नवीन दप्तर, नवी कपड्यांमुळे मुलांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता .कोरोना महामारी मुळे दोन वर्ष झाले शाळा जून मध्ये भरू शकल्या नव्हत्या पण आज बुधवार दि.१५ रोजी जवळपास सर्व ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आत्ताही गेले पंधरा-वीस दिवस झाले कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालली आहे त्यामुळे शाळा सुरू होतील की नाही याबाबत अनिश्चितता होती परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून प्रशासनाने शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज पासून जवळपास सर्वच ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आहेत.श्री हनुमान विद्यालय अवसरी मध्ये आज हलगीच्या निनादात सर्व विद्यार्थ्यांची गावातून फेरी काढण्यात आली. रांगोळीने सजलेल्या प्रवेशद्वारात उपस्थित मान्यवर सौ. शिंगटे मॅडम आणि मुख्याध्यापक श्री. लोंढे सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सौ. शिंगटे मॅडम मुख्याध्यापक श्री. लोंढे सर कर्मयोगीचे विद्यमान संचालक श्री. शांतीलाल शिंदे आणि सर्व शिक्षकांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले .शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रसाळ सर आणि आभार प्रदर्शन श्री. राऊत सर यांनी केले.
Home Uncategorized श्री हनुमान विद्यालय अवसरी मध्ये पहिल्याच दिवशी उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी लावली हजेरी.