श्री हनुमान विद्यालय अवसरी शाळेस हिन्दुस्तान फीड्स बारामती यांच्यामार्फत मोफत वह्या वाटप कार्यक्रम.

इंदापूर तालुका प्रतिनिधी : संतोष तावरे
इंदापूर (अवसरी) :श्री हनुमान विद्यालय अवसरी शाळेस आज हिन्दुस्तान फीड्स बारामती यांच्या सी. एस .आर. या योजनेतून पाचवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हिन्दुस्तान फीड्स बारामती यांच्या सी .एस .आर योजनेतून आत्तापर्यंत आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये 12 शाळामध्ये एकूण 13000 वह्या वाटप त्यांनी केले आहे. यावेळी हिन्दुस्तान फीड्स बारामती चे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सागर रसाळ यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना सांगितले,गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाला थोडासा हातभार लावण्यासाठी आमच्या कंपनीने मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि इथून पुढे सुद्धा आमची हिन्दुस्तान फीड्स बारामती सी .एस .आर या योजनेतून असेच प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटण्याचे काम करणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालक ही कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हिन्दुस्तान फीड्स बारामती चे श्री रामदास मेटकरी मार्केटिंग ऑफिसर डॉक्टर सागर रसाळ पशुधन विकास अधिकारी राजवर्धन शांतीलाल शिंदे चेअरमन जिजाऊ दूध संकलन डॉक्टर नागेश शिंदे,श्री सचिन माने व्यवस्थापकीय संचालक,श्री अजय पिसाळ जनरल मॅनेजर,श्री विनोद वसेकर साहेब उपस्थित होते. हनुमान विद्यालय अवसरी मधील माजी मुख्याध्यापक सौ. विजया शिंगटे हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या .श्री हनुमान विद्यालय चे मुख्याध्यापक श्री लोंढे सर,व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे,दत्तात्रय मगर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घळके सर यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here