बावडा:कोविड -19 या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार मागील दीड वर्षापासून बंद असलेले शाळा आज उघडल्या.आज श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री उदयसिंह पाटील श्री शिवाजी सोसायटीचे सचिव मा. श्री किरण पाटील व चि. यशराज पाटील तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री डि. आर. घोगरे सर यांच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आज विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच शिक्षकांच्या, पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या स्वागत कार्यक्रम प्रसंगी माननीय श्री उदयसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
बऱ्याच दिवसापासून शाळा बंद असलेने अध्यापकांची भूमिका कशी बदलली आहे हे सांगितले.
सॅनीटायझर चा वापर, मास्कचा वापर , स्वतंत्र पाण्याची बाटली , स्वतः ची काळजी घेण्याच्या या विषयी सूचना दिल्या.
प्राचार्य श्री घोगरे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शासनाच्या नियमाची माहिती करून दिली व शाळेने केलेल्या नियोजनाविषयी मार्गदर्शन दिली. सर्व वर्गखोल्या वरंडा सर्व बेंच याच्या स्वच्छता व सॅनिटायझेशन याविषयी उपस्थित पालकांना माहिती दिली.
या कार्यक्रमास सूत्रसंचालन श्री मुलाणी एस. टी. सर व आभार उपमुख्याध्यापक श्री जगताप जी.जे. सर यांनी केले.