इंदापुर: (इंदापूर ता प्रतिनिधी सचिन शिंदे)-भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ शेटफळ हवेली” तर्फे रविवार 13 मार्च रोजी 2022 रोजी मोरगाव, जेजुरी, बालाजी मंदिर केतकावळे या ठिकाणी पहिली सहल करण्यात आयोजित करण्यात आली होती. यात 35 ज्येष्ठ नागरिक यांनी सहलीचा आनंद लुटला.
महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या पदावर सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतरचा कालावधी हा आपल्या जन्मभूमीतच घालवण्याचा निर्णय शेटफळ हवेली येथील निवृत्त अधिकाऱ्यांनी घेतला शहरांमध्ये मोठे मोठे बंगले व सुख सुविधा असतानाही तब्बल 25 निवृत्त अधिकारी सध्या शेटफळ हवेली गावांमध्ये वास्तव्य करत आहेत.”श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ” शेटफळ हवेली तालुका इंदापूर ची स्थापना माजी अभियंता एन. टी. शिंदे (आबा) यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच करण्यात आली होती.शासनाच्या पाटबंधारे, कृषी, आरोग्य, समाज कल्याण, जिल्हा परिषद तसेच शैक्षणिक क्षेत्र यामधून निवृत्त झालेले कर्मचारी व स्थानिक शेतकरी यांना एकत्र घेऊन अध्यक्षांनी संघाची स्थापना केली आहे. निवृत्त अधिकाऱ्यांनी सेवेत असताना सर्वांनी मोठ्या सहली आणि अनेक गोष्टींचा आनंद घेतलेला असतो परंतु हाच आनंद स्वतःच्या गावातील, त्यांचेच बालमित्र,वर्गमित्र राहीलेल्या मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील जेष्ठ नागरिकांना मिळावा, उर्वरित आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत तसेच उतारवयात येणाऱ्या कठीण प्रसंगात गरजू ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य व इतर अडीअडचणीच्या वेळी योग्य मार्गदर्शन करणे योग्य सल्ला देणे,मानसिक आधार देणे व मदत करणे ही प्रमुख्य उद्दिष्ट ठेवून “श्री.भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली आहे.दिनांक 13 मार्च रोजी शेटफळ हवेली येथून प्रस्थान केल्यानंतर बारामती येथे अल्पोपहार करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक धनंजय जामदार,अध्यक्ष बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांनी संघाचे अध्यक्ष मा. एन. टी. शिंदे तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे तर्फे मास्क चे वाटप करण्यात आले. सर्व निवृत्त अधिकाऱ्यांनी गावातील जेष्ठ नागरिक म्हणजेच बालमित्र, बालसवंगडी यांचे समवेत वनभोजनासह सहलीचा आनंद लुटला फक्त एकच दिवस,परंतु हा दिवस सर्वांच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा झाला. यापुढेही ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचे हनुमंत शिंदे यांनी सांगण्यात आले.