श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त राष्ट्रवादी चषक भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे बोरी येथे आयोजन.

बोरी:(प्रतिनिधी प्रवीण पिसे) – बोरी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा रामनवमी दिवशी असते त्यानिमित्त बोरी नगरीमध्ये भव्य अशा राष्ट्रवादी चषक हॉलीबॉल स्पर्धेचे अतिशय भव्य असे नियोजन केले आहे आणि त्यानिमित्त बाराव्या क्रमांकापर्यंत बक्षिसांचा वर्षाव केला असून 12 संघ बक्षीस पात्र होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन कळस कळस वालचंद नगर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते मा. प्रतापराव (आबा) पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले यावेळी बोरी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सौ मंदा विजय ठोंबरे श्री मयूर ठोंबरे राष्ट्रवादीचे नेते गणेश नागवे ज्ञानेश्वर जोरी रामभाऊ जोरी रमेश शिंदे पांडुरंग कुचेकर लाला भिसे संदिपान मारकड सर ऍड अरुण गायकवाड पांडुरंग झगडे चंद्रकांत भिसे राहुल जाधव तसेच सर्व खेळाडू प्रेक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते प्रेक्षकांच्या गर्दीने जि. प.शाळाचे मैदान फुलून गेले होते.
दिवस रात्र झालेल्या स्पर्धेच्या सुरुवातीस प्रदर्शनीय सामने खेळले गेले नंतर लॉट्स पाडून स्पर्धेच्या सामन्यांना सुरुवात करण्यात आली दूर दूरच्या बाहेरून आलेल्या संघांसाठी जेवनाची राहण्याची उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात आली होती स्पर्धेचे नेटके नियोजन पाहून बाहेर गावचे खेळाडू आणि प्रेक्षक अचंबित आणि उल्हाशित झालेले दिसून आले.ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आर्थिक व श्रमाचे योगदान दिले त्या सर्वांचे यात्रा कमिटीने आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here