श्री गणेश कथा महात्म ज्ञानयज्ञ सोहळा उत्साहात साजरा.

थेऊर(प्रतिनिधी:सीमा कल्याणकर): चिंतामणी जन्म सोहळा कमिटी व पै.दत्तात्रय उर्फ आबा काळें सामाजिक प्रतिष्ठाण थेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश कथा महात्म ज्ञानयज्ञ सोहळा दि.18 फेब्रुवारी ते 26फेबुवारी दरम्यान श्री क्षेत्र थेऊर चिंतामणी मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमात या वर्षी पहिल्यांदाच चिंतामणी पुरस्कार देऊन 5 महिलांना गौरविण्यात आले यात सौ.सुनेत्रावहिनी पवार सौ.रुक्मिणीआई तारू महाराज सौ.राणूबाई उमाप सौ.मुक्ताबाई काळे सौ.भाग्यश्री ताई पाटील दि.20फेबुवारि रोजी आदरणिय सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.रोज अन्नदान कमिटी च्या वतीने करण्यात आले पै दत्तात्रय उर्फ आबा काळें सामाजिक प्रतिष्ठाण थेऊर यांच्या वतीने समारोप सोहळा त सहभागी झाल्याबद्दल दिंडी ला 5001 देण्यात आले गावात नगरप्रदक्षिणा करून काल्याचे किर्तन तारू महाराज यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन कमिटी चे संस्थापक अध्यक्ष श्री एकनाथ तारू महाराज यांनी केले त्याचे सहकारी व पै.दत्तात्रय उर्फ आबा काळें यांनी आपले मोलाचे योगदान दिले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here