श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात

प्रतिनिधी: मायादेवी मिसाळ
श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव केतकी या विद्यालयामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कोकरे सर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे संपूर्ण जीवन कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री मुजावर सर यांनीही नेताजी बद्दल अनमोल अशी माहिती सांगितली. हिंदी विषय तज्ञ श्री भोसले सर यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले .विद्यालयाचे सन्माननीय विद्यमान प्राचार्य श्री चव्हाण आर .डी. तसेच उपप्राचार्य भोंग एम .बी .पर्यवेक्षक खान सर, सर्व ज्येष्ठ अध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी नेताजींच्या प्रतिमेचे पूजन केले अशा या शालेय कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना महान अशा नेत्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड श्री आदलिंग सर यांनी केली .व श्री राहुल माने सर यांनी अनुमोदन दिले. तसेच कार्यक्रमाचे आभार श्रीमती चांदगुडे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मिसाळ एम एस यांनी केले .अशाप्रकारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here