दिनांक 01 फेब्रुवारी रोजी श्री काटेश्वर विद्यालय काटी येथे निर्भया पथकाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या पथकातील महिला पोलीस हवालदार बारामती पोलीस स्टेशन सौ अमृता भोईटे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये स्वसंरक्षण, लहान मुलांचे गैरवर्तन बाबत कायदे, गुड टच, बॅड टच मुलींसाठी संरक्षण कायदे, पालकांसाठी पाल्या बाबतचे गैरवर्तनाबाबत कायदे, शालेय शिस्त, सार्वजनिक शिस्त बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रसंगी इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती छायाताई पडसळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
याप्रसंगी विद्यालयाची माननीय मुख्याध्यापिका श्रीमती भोसले एम डी, पर्यवेक्षक श्री जाधव आर. ए. ,सौ पुकळे एस एस ,सौ दावणे बारवकर पी.व्ही., सौ कांबळे जी टी कु देवकाते ए. ए., श्री सरताळे ए.बी.,श्री जाधव व्ही. के., श्री शिंदे डी. जी. श्री निकम एस एन, श्री ठवरे के एन, श्री चांदणे एच जी, श्री करे एस एस, श्री चांदणे एस जी श्री पांढरे एस ए ,श्री मोरे डी यु उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ डोंबाळे ए.डी.यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री वायचळ एस सी यांनी केले कार्यक्रमासाठी श्री मिसाळ एस एस यांनी परिश्रम घेतले