👉 आज भरणेमामांच्या उपस्थितीत होणार सेमिनार.
श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या IT क्षेत्रातील विविध कोर्सेस मोफत या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद इच्छुक व गरजूवंत विद्यार्थ्यांनी नोंदवला, जवळपास 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून इंदापूरसह अनेक तालुक्यातून यात विद्यार्थी सहभागी झाले होते.सदर संकल्पनेला विद्या प्रतिष्ठान इंदापूर कॉलेज चे विशेष सहकार्य लाभले आहे.आज शनिवार दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता IT COURSES चा विनामूल्य सेमिनार/मीटअप आणि ऑनलाइन प्रशिक्षण गुरुकृपा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे TATA STRIVE कंपनीच्या माध्यमातून घेतले जाणार आहे व प्लेसमेंटसाठी मोठी संधी मिळणार आहे अशी माहिती शौर्य प्रतिष्ठान इंदापूरच्या माध्यमातून देण्यात आली.आज होणाऱ्या सेमिनारमध्ये माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राहुल गुंडेकर यांनी दिली.
श्रीराज भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आला. परंतु शौर्य प्रतिष्ठान इंदापूरने मात्र यावेळी अनावश्यक खर्च टाळून एक नवीन संकल्पना तयार करून या संकल्पनेतून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना खास करून आयटी क्षेत्रातील व इतर माध्यमातील ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कोर्सेस मोफत उपलब्ध करून एक आदर्श निर्माण करून दिला.शौर्य प्रतिष्ठान इंदापूर यांच्या माध्यमातून राहुल गुंडेकर, ऋषी काळे व त्यांचा मित्रपरिवार मिळून युवा नेते श्रीराज भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त IT क्षेत्रातील विविध कोर्सेस मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. व या कोर्सेसच्या माध्यमातूनच नामांकित कंपनीचे ऑनलाईन ट्रेनिंग व प्लेसमेंटची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने
– डेटा अनॅलिटिकस
– IT ऑटो मेशन
– IT सपोर्ट
– UX डिझाईन
– डिजिटल मार्केटिंग
– AWS – Cloud Practitioner इत्यादी कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली गेली नाही व कुठलाही अनुभवाची यासाठी आवश्यकता नव्हती.या सर्व कोर्सेसची मार्केटमध्ये सध्या खूप डिमांड आहे.सहज सोप्या पद्धतीने करता येईल असे हे कोर्सेस होते.कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट देण्यात येईल असेही शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले होते. यासाठी पात्रता BA,B.COM,BSC,BBA,BCA,MA,MBA,Mcom,MSC इंजिनीरिंग अश्या स्वरूपाची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक होते.याच अनुसंघाने श्रीराज दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित शौर्य प्रतिष्ठान, इंदापूरच्या संकल्पनेतून IT क्षेत्रातील विविध मोफत कोर्सेसचा सेमिनार आज शनिवार दि.10 डिसेंबर 2022 रोजी गुरुकृपा सांस्कृतिक भवन, इंदापूर येते 11 वाजता (टाटा कंपनी) च्या माध्यमातून पार पडणार असल्याने सर्व इच्छुक व गरजूवंत विद्यार्थीनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. राहुल गुंडेकर यांनी केले आहे
Home Uncategorized श्रीराज भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या मोफत आयटी क्षेत्रातील विविध कोर्सेसचा लाभ...