श्रीराज भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त शौर्य प्रतिष्ठानचा आदर्शवत उपक्रम.

श्रीराज भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. परंतु शौर्य प्रतिष्ठान इंदापूरने मात्र यावेळी अनावश्यक खर्च टाळून एक नवीन संकल्पना तयार करून या संकल्पनेतून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना खास करून आयटी क्षेत्रातील व इतर माध्यमातील ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कोर्सेस मोफत उपलब्ध करून एक आदर्श निर्माण करून दिला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शौर्य प्रतिष्ठान इंदापूर यांच्या माध्यमातून राहुल गुंडेकर, ऋषी काळे व त्यांचा मित्रपरिवार मिळून युवा नेते श्रीराज भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त IT क्षेत्रातील विविध कोर्सेस मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. व या कोर्सेसच्या माध्यमातूनच नामांकित कंपनीचे ऑनलाईन ट्रेनिंग व प्लेसमेंटची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने
– डेटा अनॅलिटिकस
– IT ऑटो मेशन
– IT सपोर्ट
– UX डिझाईन
– डिजिटल मार्केटिंग
– AWS – Cloud Practitioner इत्यादी कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही व कुठलाही अनुभवाची यासाठी आवश्यकता नाही.या सर्व कोर्सेसची मार्केटमध्ये सध्या खूप डिमांड आहे.सहज सोप्या पद्धतीने करता येईल असे हे कोर्सेस आहेत.कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट देण्यात येईल असेही शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे. यासाठी पात्रता- BA,B.COM,BSC,BBA,BCA,MA,MBA,Mcom,MSC इंजिनीरिंग अश्या स्वरूपाची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तालुक्यातील ज्या व्यक्तींना यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे अशा इच्छुकांनी आपले रेजिस्ट्रेशन 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2022 या कालावधीत करून घ्यावी असे आवाहन राहुल गुंडेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य राहुल गुंडेकर आणि मित्रपरिवार यांचा असणार आहे.अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा.
राहुल गुंडेकर – 8180088008
ऋषी काळे – 8668730093 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here