“अनुदानातून बाहेर पडा” ही योजना सध्या प्रशासनाकडून राबविण्यात येत असून यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांपैकी सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसणाऱ्यांसाठी तो लाभ नाकारण्याचा पर्याय या योजनेतून उपलब्ध करून दिला आहे. कौटुंबिक परिस्थिती सुधारून सुद्धा काही लोक जुन्या रेशन कार्डचा वापर करून धान्य घेत आहेत. अनेक जन स्वस्तातले रेशन धान्य खाजगी लोकांना विकतात, जनावरांसाठी विकतात असे निदर्शनास प्रशासनाच्या आले असून प्रशासनाने त्याबाबत खडक पावले उचलली आहेत. त्यामुळेच प्रशासनाने जाहीर केले असून कारवाई करण्या अगोदरच रेशन धान्य वरचा हक्क सोडा .एक सप्टेंबर च्या अगोदर ” अनुदानातून बाहेर पडा ” या योजनेतून ज्या कुटुंबाचे ग्रामीण साठी वार्षिक उत्पन्न 44 हजार व शहरासाठी 59 हजार पेक्षा जास्त आहे असे लाभार्थी, चार चाकी वाहनधारक , आयकर भरणारे सरकारी , निम सरकारी नोकरी, निवृत्ती वेतनधारक ,व्यावसायिक बागायतदार, ज्या कुटुंबातील व्यक्ती परदेशात आहे. इत्यादी विविध नियमांमध्ये बसणाऱ्या लोकांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून संबंधित तलाठी किंवा स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आणि जे लोक या नियमांमध्ये बसून सुद्धा एक सप्टेंबर च्या अगोदर आपला रेशन धान्य वरचा हक्क सोडणार नसतील त्यांना एक सप्टेंबर पासून फौजदारी कारवाई किंवा मागील धान्याची वसुली होऊ शकते, त्यामुळे अशा नागरिकांनी आपला शिधापत्रिकेवरचा अन्नधान्याचा हक्क सोडण्यासाठी तलाठी किंवा स्वस्त रेशन धान्य दुकानात जाऊन फॉर्म भरणे गरजेचे आहे .काल इंदापूर मध्ये बहुसंख्य लोकांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम कार्डधारकांनी या योजनेचा फॉर्म मा. त्रिकोण कुलकर्णी उपायुक्त पुरवठा पुणे तसेच इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या मोहिमेत सहभागी होऊन स्वतः भरून दिला आणि या लोकांनी स्वतः पुढे येऊन फॉर्म दाखल केल्याबद्दल त्यांचे मा. त्रिगुण कुलकर्णी व तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले. प्रत्येक गावातील रेशन कार्ड धारक जे पात्र नसतील अशांनी स्वतः पुढे येऊन आपला रेशन धान्याचा हक्क सोडू लागले आहेत. आपणही शिधापत्रिकेवरील धान्यास पात्र नसाल तर लवकरात लवकर कारवाई अगोदरच फॉर्म भरून देणे गरजेचे आहे.