वडापुरी तालुका इंदापूर येथील श्रीनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेली पंधरा वर्षापासून ग्रामीण भागातील गरजू महिलांना शिवणकाम, ब्युटी पार्लर ,भरत काम, लोकरीच्या बाहुल्या बनवणे, विणकाम ,लोणचे पापड तयार करणे, मसाला तयार करणे, इत्यादी उद्योगाचे मोफत क्लासेस घेत आहे .त्यामुळे या संस्थेचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे.शिलाई मशीनमधील धागा बनणार स्त्री जीवनाचा आधार कारण अवसरीमध्ये कालपासून आशा सेविका सौ. अर्चना माने यांच्या प्रयत्नातून शिलाई मशीनचे मोफत प्रशिक्षण या संस्थेकडून व ग्रामपंचायत अवसरीच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण एक महिना चालणार असून यामध्ये सर्व कपड्यांचे शिलाई चे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यामुळे अवसरीतील महिलांनाही रोजगाराची वाट शिलाई मशीनच्या धागातून सापडणार आहे. पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारी शिलाई मशीन अवसरी मध्ये आल्यामुळे महिलांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संस्थेला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वयंरोजगार मिळवून देणारा धागा खरोखरच ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीनच्या प्रशिक्षणातून दोन हातास काम मिळणार आहे .त्यामुळे ग्रामीण भागातील महिलाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आनंद व्यक्त करत आहेत. यावेळी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना श्रीनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सचिव सौ. सुजाता नितीन भारती म्हणाल्या की, ग्रामीण भागातील गरजू व गरीब महिलांना या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने सर्व प्रकारचे प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. परंतु हे काम ग्रामीण भागापुरतेच मर्यादित न ठेवता पूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रभर करण्याचे एक आमचे स्वप्न आहे. संस्थेचे अध्यक्ष सुनिता गोरख चंदनशिवे व उपाध्यक्ष रेश्मा सिताराम पवार गुलशन सय्यद, ठकू माने, पुष्पा पवार ,संगीता भुजबळ, वैशाली चंदनशिवे ,मनीषा चंदनशिवे ,यांचाही या संस्थेसाठी मोलाचा वाटा आहे. यावेळी अवसरी गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काटे, समाधान मोरे ,प्रगतशील बागायतदार योगेश पवार ,शिवाजी भोसले आणि मोठ्या संख्येने गावातील महिलावर्ग उपस्थित होता.