श्रीगोंदा तालुक्यात महावितरण अभियंता लाचेच्या जाळ्यात.१५ हजार लाच घेताना रंगेहात पकडले.

प्रतिनिधी:अजय रंधवे.
श्रीगोंदे : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून महावितरण विभाग सतत चर्चेत राहिला आहे.कधी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे कनेक्शन तोडून असेल किंवा संपूर्ण डी पी तोडणी करणे या कारणाने महावितरण सतत चर्चेचा विषय बनत चालले आहे.
परंतु त्यातच श्रीगोंदा तालुक्यात महावितरण अभियंता चा विषय समोर आला आहे.तो अधिकारी लिंपणगाव (ता. श्रीगोंदे) ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकल्याचे कारण देत वीजजोड तोडला गेला.मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पदाधिकारी अधिकाऱ्यांकडे विनवणी करीत होते.
मात्र त्यासाठी वीस हजार द्या, अशी सतत मागणी करणाऱ्या महावितरणचा कनिष्ठ अभियंता पांडू पुनाजी मावळी याला १५ हजाराची लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिधीक्षक हरिष खेडकर यांच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लिंपणगाव ग्रामपंचायतीचे विद्युत बिल थकलेले होते. महावितरणकडून ग्रामपंचायतीचा वीज जोड तोडला होता. विद्युत जोड तोडले. मुळे गावाचा पाणीपुरवठा बंद होत असल्याने तक्रारदारांनी यातील आरोपी लोकसेवक मावळी यांची भेट घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करुन देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी मावळी याने हा वीजजोड जोडण्यासाठी वीस हजाराची मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून आज केलेल्या लाच मागणी पडताळणीत आरोपी मावळी याने लाचेची मागणी पंचासमक्ष करून ही लाच रक्‍कम १५ हजार रुपये लिंपणगाव येथील एका हॉटेलात घेतले. सापळा कारवाई करीत मावळी याला रंगेहाथ पकडण्यात आले.
खरं तर गेल्या काही दिवसांपासून महावितरण असो की इतर विभाग लाच घेण्याचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसून येते आता याबाबत सामाजिक भान जपत प्रत्येकाने अशा गोष्टी आळा घालणे गरजेचे आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here