इंदापूर येथील शौर्य प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात यावर्षी प्रथमच शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने “इंदापूर बॅडमिंटन स्पर्धा 2022” या स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धाचे उद्घाटन उद्या शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता होणार असल्याची माहिती शौर्य प्रतिष्ठान इंदापूरच्या वतीने देण्यात आली आहे. नियोजनाच्या सुरुवातीला ही संपूर्ण स्पर्धा इंदापूर येथील सुप्रसिद्ध गुरुकृपा संस्कृतिक भवन येथे करण्यात आली होती परंतु वाढता प्रतिसाद पाहता नियोजनात बदल करून सदरची संपूर्ण स्पर्धा ही इंदापूर क्रीडा संकुलन येथील बॅडमिंटन हॉल या ठिकाणी होणार असल्याची माहिती शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले आहे. इंदापूर क्रीडा संकुलनात आता या खेळाची संपूर्ण तयारी झालेली आहे.इंदापूर तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केले असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील लोकांनाचीही आता उत्कंठा वाढू लागलेली आहे. जरी ही स्पर्धा प्रथमच भरवली गेली असली तरी आत्तापर्यंत 20 स्पर्धकांची नावे आलेली असून या स्पर्धेतील सामने सोलो स्पर्धक पद्धतीने पंचांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर क्रीडा संकुलन येथेच इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी चावले साहेब यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे अशी माहिती शौर्य प्रतिष्ठान इंदापूरच्या सदस्यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना दिली.बॅडमिंटन खेळाचे महत्त्व सांगताना इंदापूर क्रीडा अधिकारी चावले साहेब यांनी म्हणाले की, बॅडमिंटन खेळामुळे शारीरिक क्षमता वाढवते ,मानसिक तणाव कमी होतो,हृदयरोगाचा धोका कमी होतो,शरीराची लवचीकता वाढते,हात व पायांची हाडे मजबूत व बळकट बनतात,विचार करण्याची क्षमता वाढते,वचन कमी करण्यात मदत होते यामुळे बॅडमिंटन हा खेळ महत्त्वाचा आहे आणि शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे इंदापूर तालुक्यातील युवकांना बॅडमिंटनची आवड निर्माण होण्यास मदत होईल असे मत क्रीडा अधिकारी चावले साहेब यांनी व्यक्त केले.
Home Uncategorized शौर्य प्रतिष्ठान इंदापूरच्या वतीने उद्यापासून “इंदापूर बॅडमिंटन स्पर्धा 2022” या स्पर्धेचे क्रीडा...