शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांवर नवीन संकट.. मोकाट कुत्र्यांचा शेळी कळपांवर हल्ला.. शेटफळ हवेली येथील घटना.

शेटफळ हवेली: शेती व्यवसायाबरोबरच आपल्या लेकरां सारखे जपत शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता नवीन संकट समोर आले आहे. ग्रामीण भागात सर्रास शेळीपालन हा व्यवसाय घराघरांमध्ये केला जातो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्याकडे आता पाहिले जाते परंतु अलीकडेच शेटफळ हवेली येथील धनुनगर मधील बलभीम केरू टेकाळे (वय 62) या वयस्कर शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्याबद्दल जे घडले ते पाहून एक भीतीचे वातावरण शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे.
आज बुधवार 27 जुलै रोजी दुपारी 4 वाजता शेटफळ हवेलीतील बलभीम टेकाळे हे आपल्या गट नंबर 252 मध्ये शेळ्या चारण्यासाठी गेले असता तेथे 5 ते 6 मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांच्या शेळ्यांवर हल्ला चढवला. बघता बघता या कुत्र्यांच्या टोळक्यांनी एक मोठे बोकड व एक शेळी यांना मारून टाकले त्याचप्रमाणे दुसऱ्या शेळीवर सुद्धा हल्ला करून तिला जखमी केले. वयाने ज्येष्ठ असलेले बलभीम टेकाळे व त्यांच्या सुनेने आरडाओरडा व प्रतिकार केला परंतु सदरची कुत्र्यांची असलेली टोळी त्यांच्या अंगावर धावून येत होती.शेवटी बलभीम टेकाळे व त्यांच्या सुनेने आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या वस्तीवरील काही शेतकरी मदतीला येऊन त्या कुत्र्यांना तेथून हुसकावून लावले पण तोपर्यंत एक शेळी एक बोकड हे मृत्यूमुखी पडले होते आणि दुसरी एक शेळीही जखमी झाली.

आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या बलभीम केरू टेकाळे यांच्यावर आता जणू संकटच आले असून त्यांना शासनामार्फत योग्य अशी नुकसान भरपाई दिली जावी अशीच या वृद्ध शेतकऱ्याची अपेक्षा आहे.या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर प्रशासनाकडून बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा शेटफळ हवेलीतील संतोष बनकर यांनी व्यक्त केली त्याचप्रमाणे शासनाकडून योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी विजय शिंदे व राजेंद्र टेकाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एकूणच मोकाट कुत्र्यांच्या माध्यमातून आता शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभा ठाकले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here