इंदापूर( प्रतिनिधी अक्षय खरात)- अंथुणे चौकामध्ये येथील शेती महामंडळाच्या कामगारांच्या हक्काच्या घरासाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते शेखर भाऊ काटे यांनी एक दिवसीय लक्षणीय उपोषण करणार आहे. शेती महामंडळ 17 वर्षा पूर्वी बरखास्त झाले आहे. तेव्हा पासून आजपर्यंत येथिल कामगारांच्या जीवनाचे हाल चालू झाले आहे.त्या कामगारांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न् निर्माण झाला आहे. त्यातुन कसातरी मार्ग काढत ते जीवन जगत असताना आता त्याच्यासमोर आजुन एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ते जिथे वास्तव करत आहे येथील त्यांच्या राहत्या घराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे घरे कधीही पडू शकतात व त्यात जिवीत हानी होवू शकते . या सर्व जिवीत हानीस जबाबदारी कोणाची? हा तेथील स्थानिक रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रहिवाशांनी आपल्याला प्रत्येकी 2 गुंठे जागा मिळावी अशी मागणी केली आहे. व त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लक्षणीय उपोषण अंथूणे येथे ते कामगार करणार आहे. यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबंधित सर्व अधिकारी यांना देण्यात आले आहे असे शेखर काटे यांनी सांगितले.
Home Uncategorized शेती महामंडळाच्या कामगारांच्या हक्काच्या घरासाठी 15 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लक्षणीय उपोषण.