शेतीपंपाची वीज कट करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय विषयी ऊर्जामंत्री यांच्याशी बोलणार- शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे

 इंदापूर ता प्रतिनिधी:सचिन शिंदे

इंदापूर :गेल्या दहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज कनेक्शन महावितरणाने तोडल्याबद्दल व डीपी सोडवण्याचा एकहाती कार्यक्रम फक्त इंदापूर तालुका पुरताच मर्यादित चालू आहे याविषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी लवकरच चर्चा करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन त्वरित जोडण्यास संदर्भात विनंती करणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की सद्य परिस्थितीमध्ये ऊस तोडणी चा कार्यक्रम चालू असून शेतकऱ्यांकडे सध्या ऊस बिलाचे पैसे मिळाल्याशिवाय इतर कोणतेच उत्पन्न साधन नाही,त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसायामध्ये पुरेसा नफा शिल्लक राहत नाही मग हे दोनच उत्पन्नाची साधने सध्या शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामुळे त्यांना काही वेळ दिला जावा आणि ज्या शेतकऱ्यांनी शेतीची बिले सुरळीत भरले आहेत त्यांना वीज देणे बंधनकारक असताना त्यांची वीज कनेक्शन बंद करून त्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल त्यामुळे त्यांची वीज त्वरित जोडण्यात यावी अशीच शिवसेनेची भूमिका आहे असे मत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी व्यक्त केले.
त्याचप्रमाणे शेजारील बारामती, माढा, कर्जत करमाळा या तालुक्यामध्ये विज सुरळीत चालू आहे ज्याप्रमाणे इतर तालुक्याला विज बिल भरण्यासंदर्भात मुदत दिलेले आहेत त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यालाही किमान महिनाभर मुदत देण्यात यावी. सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर विज कनेक्शन तोडून एक प्रकारचा अन्याय होत असल्याची परिस्थिती इथं निर्माण झालेले आहे असे मत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी व्यक्त केले.पुढे शिवसेना तालुकाप्रमुख म्हणाले की, कोरोनाच्या महामारी मुळे कुटुंबातील जर करता पुरुष मयत झाला असेल आणि कुटुंबाची जबाबदारी महिलेवर असेल तर अशा महिलेचे कोणत्याच प्रकारचे वीज कनेक्शन तोडले जाऊ नये ही  आग्रही भूमिका शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी मांडली. एकूणच शेतकऱ्यांना महिनाभर वेळ द्यावा व त्यानंतर त्यांच्याकडून वसुली केली जावी अशी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण या सर्व गोष्टी नंतर महावितरण यावर कोणता तोडगा काढेल हे आता पाहणे गरजेचे आहे.

  

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here