सामायिक असलेल्या जमिनीतून मुरूम उचलल्याचा शेतकरी कुटुंबाकडून आरोप.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कळस गावातील बिरंगुडवाडी येथील सामायिक शेतातील जवळपास पाच हजार ब्रास बेकायदेशीर मुरूम व माती उचलली. जमीन मालकाने त्याची महसूलला तक्रार केली. त्याचा राग मनात ठेवून, त्या कुटुंबाला सात जणांनी बेदम मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कळस येथे घडली आहे.याबाबत इंदापूर येथे रविवार ( दि. 19 मे ) रोजी, तक्रारदार यशोदा नवनाथ सांगळे ( वय ३५ ), त्यांचे पती नवनाथ बन्याबा सांगळे ( वय ४०) व त्यांचे सासरे बन्याबा बाबु सांगळे ( वय ७० ) सर्व रा. बिरंगुडवाडी पो. कळस, ता. इंदापूर जि. पुणे यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.यावेळी माहिती देताना ते म्हणाले की, आमच्या मालकी हक्काचे मौजे बिरंगुडवाडी येथील समाईक मालकीच्या गटातुन (गट नं. २९५ ) गटातुन इसम नामे, मोहन बाबु सांगळे, सोमनाथ मोहन सांगळे, भारत मोहन सांगळे हे सर्व रा. बिरंगुडवाडी पो. कळस ता. इंदापुर जि.पुणे यांनी बेकायदेशीरपणे व शासनाची किंवा आमच्या परवानगीशिवाय जवळपास पाच हजार ब्रास मुरूम व मातीचे उत्खनन करून नेहले आहे.त्यामुळे आम्ही सोमनाथ सांगळे यांना विचारले की, आमच्या क्षेत्रातील मुरुम का उचलत आहे. याची तक्रार मी तहसिलदार साहेबांकडे करील. असे माझे पती म्हणाले असता त्यांनी मला व माझे पती व सासरे यांना मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तुला काय करायचे ते कर, माझी तहसिलदार, प्रांत, महसुल मंत्री व महसुल मत्र्यांचे ओएसडी पर्यंत सबंध आहेत. मी ममुरूम उचलण्यासाठी, मी तहसीलदार यांना मोठी रक्कम दिली आहे. ते तुझी तक्रार पण घेणार नाहीत. उलट आम्ही तुझ्या कुटुंबावरती खोटे केसेस दाखल करु असे दममदाटी करत आम्हाला आमच्या रानातुन मारत बाहेर काढले.त्यांनंतर आम्ही दि. ८ एप्रिल २०२४ रोजी इंदापूरचे तहसिलदार यांना तक्रारी अर्ज दिला होता. त्या तक्रारी अर्जाचा राग मनात धरून, गुरुवार ( दि. १६ मे २०२४ ) रोजी च्या रात्री १.३० वाजता, आमच्या बिरंगुडवाडी येथील घरात घुसून, सोमनाथ मोहन सांगळे, भारत मोहन सांगळे व अनोळखी पाच माणसे असे एकूण सात जणांनी मला, माझे पती व सासरे यांना बेदम मारहाण केली आहे. याबाबत त्याच रात्री २ वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलीस ठाणे अंकित जंक्शन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तेथील पोलीस कर्मचारी यांनी आमच्यावर उपचार केले. जबाब नोंदवून घेतले. मात्र मारहाण करणाऱ्या गुंडांवर कोणतीही कारवाई केली नसून, त्या गुंडाकडून आमच्या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी पोलिसांनी आम्हांला सुरक्षा द्यावी. व त्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांवर गुन्हे दाखल करावेत. अशी आमची मागणी आहे. असे पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.