इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील निराभिमा सहकारी साखर कारखाना येथे पोलीस स्टेशनने परवानगी नाकारलेली असताना देखील शेतक-यांची गर्दी जमाव जमवुन कारखाना परीसरात मोठयाने घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह आयोजक व उपस्थित दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांवर इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत समाधान तुकाराम केसकर (वय 28 वर्षे पोलीस शिपाई नेमणुक इंदापुर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुरुप बुधवार (ता.17 मे) रोजी सकाळी 9 चे सुमारास इंदापुर पोलीस स्टेशन हददीत निराभिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर येथिल कारखाना प्रशासन यांनी 1 डिसेंबर पासुन अदयाप पर्यंत सभासदांचे उस बिल अदा न केल्याने आप्पासाहेब जगदाळे यांचे नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समिती बावडा यांनी जयभवानी मंदीर लाखेवाडी ते निराभिमा सहकारी साखर कारखाना गेट शहाजी नगर पर्यंत आत्मक्लेश पदयात्रा आयोजीत केली होती.त्यापूर्वी आत्मक्लेश पदयात्रा आंदोलन आयोजकांची बैठक घेऊन कलम 149 ची नोटीस देवून त्यांना सध्या पुणे ग्रामीण जिल्हयात मा जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे समक्ष सांगीतले होते.मात्र परवानगी नाकारलेली असताना देखील शेतक-यांची गर्दी जमाव जमवुन कारखाना परीसरात मोठयाने घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग केला म्हणुन आप्पासाहेब जगदाळे (रा. सराटी ता. इंदापुर जि. पुणे), पंडीत पाटील, विजय गायकवाड, धैर्यशिल पाटील, अजित टिळेकर, महादेव घाडगे, तुकाराम घोगरे (सर्व रा. बावडा ता. इंदापुर जि. पुणे) यांचेसह इतर 200 ते 250 शेतकरी (नावे माहीत नाहीत) यांचे विरोधात सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला.
Home Uncategorized शेतकऱ्यांसाठी आत्मक्लेष आंदोलन करणाऱ्या आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह इतर आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल.