शेतकरी संघटनेचे प्रशांत मानकर यांची मानकरवाडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड.

शेतकरी संघटना इंदापूर तालुका युवा आघाडी उपाध्यक्ष प्रशांत हनुमंतराव मानकर यांची ग्रामपंचायत मानकरवाडी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रशांत मानकर हे गेले कित्येक वर्ष सर्पमित्र म्हणूनही मानकरवाडी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत तसेच ते शेतकरी संघटनेत काम करत आहेत.गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आड अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याचे काम ते करीत आहेत, कित्येक लोकांची त्यांनी शेतकरी संघटनेशी नाळ जोडण्याची काम केले आहे. सामाजिक कामात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे, त्यामुळेच त्यांचा मानकरवाडी पंचक्रोशीत सर्व लोकांबरोबर एक दांडगा जनसंपर्क निर्माण झाला आहे, आणि त्याच्याच जोरावर सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना प्रशांत मानकर म्हणाले की, मानकरवाडी गावातील सरपंच , उपसरपंच सर्वच गावातील लोकांनी माझ्यावर तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली ती मी यशस्वीरित्या पार पाडेल, सर्वांना समान न्याय देण्याचे काम करेल, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे त्यांनी सांगितले .यावेळी सरपंच महादेव हनुमंत शिर्के, ग्रामसेवक घोळवे टी. एस. तसेच सदस्य अनिकेत मोरे,सागर कणसे,पप्पु यादव, माजी सरपंच अनिल तुपे ,शेतकरी संघटनेचे सचिन पवार, अनिल शिंदे ,ज्येष्ठ नागरिक संभाजी कणसे ,संजीवन मोरे, शहाजी अनपट,सुनील मोरे भाजप नेते तानाजी थोरात, पप्पू निकम,संतोष मोरे,विलास कणसे ,बाळासो लोंढे,अतुल यादव सचिन यादव व इतर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. शेतकरी संघटने कडून ही त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होताना दिसत आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून ही त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here