शेतकरी संघटनेची तोफ शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उद्या सांगलीत कडाडणार..लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा- शेतकरी संघटनेचे नेते पांडुरंग रायते यांचं आवाहन.

छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून शेतकरी संघटनेने भव्य शेतकरी मेळावांचे आयोजन विष्णुदास भावे नाट्यमंदिर हरभट रोड सांगली या ठिकाणी उद्या सोमवार दि. २६ जून २०२३ दुपारी एक वाजता केले असून या शेतकरी मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, शेतकरी विरोधी कायदे बदला, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत .सरकारच शेतकऱ्यांच्या हत्या करत आहे असा घनाघात पांडुरंग रायते यांनी केला. शेतकऱ्यांची एकजूट नाही झाली तर शेतकरी हा पुढचा काळात टिकूच शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनीही एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यासाठी हा शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी शेतकरी संघटने कडून सरकारकडे या मागण्या केल्या जाणार आहेत १) सर्व शेतकऱ्यांना वीज बिलातून व कर्जातून मुक्त करा २) गोवंश हत्या बंदी व वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा ३) दोन साखर कारखान्यातील व इथेनॉल प्रकल्पामधील अंतराची अट रद्द करा व ऊस व साखर उपपदार्थावरील कर रद्द करा ४) गुंठेवारी खरेदी-विक्री वरील बंधने काढून टाका ५) स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाची प्रति टन रुपये दहा प्रमाणे होणारी कपात रद्द करा ६) सर्व शेतकऱ्यांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान द्या (लूट वापसी) ७) म्हशीच्या एक लिटर दुधास एक लिटर पेट्रोलचा व गाईच्या एक लिटर दुधास एक लिटर डिझेलचा भाव द्या. अशा अनेक मागण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असून त्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटने कडून केले जात आहे. या शेतकरी मेळाव्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते मा. रघुनाथ दादा पाटील, पी रेड्डी साहेब (मुख्य सल्लागार भारतीय किसान संघ परिसंघ) मा. कालिदास आपेट (कार्याध्यक्ष शेतकरी संघटना) शिवाजी नाना नांदखिले (अध्यक्ष क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड) मा. अजित काळे (उपाध्यक्ष शेतकरी संघटना) पांडुरंग रायते (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेतकरी संघटना) इत्यादी संघटनेचे नेते कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून आपणही लाखोंच्या संख्येने या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे व शेतकऱ्यांची एकजूट दाखवावी अशी विनंती रायते यांनी केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here