संतोष तावरे: इंदापुर प्रतिनीधी
वीज कंपनीच्या घोटाळ्यामुळे जळित ऊस झालाय ,पण भरपाई मिळत नाही ,अशीच तक्रार सातत्याने सर्वत्र ऐकू येते. परंतु थोडा पाठपुरावा करून योग्य कागदपत्रे सादर केली, तर वीज कंपनीला भरपाई द्यावीच लागते. ऊस जळीताच्या घटना घडणे जवळपास नेयमीतच झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एकरी काही हजारांपासून लाखांपर्यंत नुकसान होते. शेतातून गेलेल्या विजेच्या तारा लोंबकाळणे ,खांबावरील कप फुटणे, ट्रांसफार्मर मधून ठिणग्या उडणे ,तारा जीर्ण होणे ,अशा अनेक कारणांनी जर ऊस जळाला असेल तर मात्र भरपाई वीज कंपनीकडून मिळू शकते .अनेक शेतकऱ्यांना वीज कंपनी भरपाई देते हे माहीत नाही .तर बहुसंख्य शेतकऱ्यांना कागदपत्रे काय द्यायचे हे समजत नाही. वीज कंपनीकडून याबाबत फारशी जागृती करण्याची तसदी घेतली जात नाही. हो अहवालानुसार कंपनी जबाबदार असल्यास शेतकऱ्यांनी कागदपत्रे लवकर सादर केल्यास भरपाई निश्चितच मिळू शकते. विद्युत कंपनीनेही तालुकास्तरावर एखाद्या अधिकाऱ्याकडे जळीतासाठीची अतिरिक्त जबाबदारी द्यावी ,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .अशी घटना बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील सुभद्राबाई निंबाळकर यांनी पाठपुरावा करून वीज कंपनीकडून तब्बल 93 हजार रुपये भरपाई वसूल केले आहे. सुभद्राबाई महादेव निंबाळकर या शेतकरी महिलेने सन 2017 मध्ये झालेल्या ऊस जळीताची नुकतीच वीज कंपनीकडून समाधानकारक नुकसानभरपाई मिळवले आहे .असेच सर्व शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. पाठपुरावा केल्यानंतर भरपाई ही मिळू शकते हे महिला शेतकरी सुभद्राबाई निंबाळकर यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे , शेतकऱ्याने अपघात होण्याच्या अगोदरच आपल्या शेतातील तारा लोंबकळत असल्यास तशी तक्रार अर्ज जवळच्या वीज वितरण कंपनी कार्यालयात देऊन त्याची पोहोच घ्यावी. जळीताचा अहवाल मिळाल्यास वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही, तर अंतर्गत तक्रार निवारण कक्षामध्ये किंवा जिल्हा ग्राहक आयोगाकडे दाद मागावी. अधिक माहितीसाठी ग्राहक पंचायतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा किंवा शेतकरी संघटनेसी संपर्क साधावा शेतकऱ्यास विनामूल्य मार्गदर्शन मिळेल. .
भरपाई मिळविण्यासाठी अशी लगतात साधारणपणे कागदपत्रे .
१) नुकसान भरपाईचा अर्ज २) तलाठी पंचनामा ३) तालुका कृषी अधिकारी यांचे पत्र ( ऊस जळून व ठिबक जळून किती नुकसान झाले असा उल्लेख असणारे) ४ ) कारखान्याचे पत्र ( गट क्रमांक. क्षेत्र. गाळपाचे टनेज. उसाचा दर .जळीतामुळे केलेली कपात. अदा रक्कम पाशा माहितीसह) ५) जळीत वर्षाचे व मागील तीन वर्षाचे कारखान्याची ऊस बिले. ६) ठिबक संच खरेदी बिल. ७) जळीत वर्ष व मागील तीन वर्षाचे सातबारा व पीक पाहणी ८ ) शासकीय .निमशासकीय. खाजगी व अन्य संस्थांकडून नुकसान भरपाई मिळाली नाही .भविष्यात घेणार नाही. मी व माझ्या वारसाने अर्ज केला नाही करणार नाही. अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र.९) जळीत क्षेत्रासह शेतकऱ्याचा फोटो