शेटफळ हवेली तलावातूनच पाणीपुरवठा करण्याची गरज काय? शासनाच्या निधीचा अपव्यय टाळण्यासाठी वरकुटेकरांनी दिले लक्षवेधी निवेदन .वाचा सविस्तर

मौजे वरकुटे खुर्द, ता. इंदापूर, जि. पुणे येथील प्रस्तावित जलजिवन मिशन योजनेस स्थगिती देणेबाबतं नजीकच्या शेतकऱ्यांनी थेट अधीक्षक अभियंता सो. महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, पुणे यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात असे नमूद केले आहे की,मौजे वरकुटे खुर्द, ता. इंदापूर, जि. पुणे प्रस्तावित जलजिवन मिशन योजना शेटफळ तलावातून आहे हे अंतर साधारण: ५.५ की.मी आहे. सदरची प्रस्तावित योजना मा. सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेत सविस्तर चर्चा न करता तसेच ग्राम पाणी पुरवठा समितीची कोणतीही बैठक न घेता शासनाची दिशाभूल करून प्रस्तावित केलेले आहे. सदर प्रस्ताव पाठविताना पाणी पूरवठा .व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक ०४ सप्टंबर २०२० मधील मार्गदर्शक सुचनांचे कोणतेही पालन केले नाही. वास्ततिक पाहता वरकुटे खुर्द, ता. इंदापूर गावा हद्दीतच मोठा पाझर तलाव असून तेथून यापुर्वीच निमगाव केतकी व वरकुटे खुर्द गावांची नळ पाणी पुरवठा कार्यान्वित असून प्रत्येक पावसाळयात पाझर तलाव निरा डावा कालव्यातून पुर्ण भरला जातो. त्यामूळे शेटफळ हवेली तलावातून नळ पाणी पुरवठा योजना करणे शासन निधीचा अपव्यय आहे. तसेच प्रस्तावित शेटफळ हवेली तलावातून योजना राबवलेस अंतर जास्त असल्याने देखभाल दुरूस्ती खर्च तसेच जास्त अश्वशक्‍तीचे विदयुत पंप वापरावे लागणार असल्याने येणारे लाईट बिल ग्रामपंचायतला परवडणारे नाही. तुलनेत वरकुटे खुर्द पाझर तलावातून योजना राबवलेस तत्सम खर्च नगन्य असणार आहे. तरी प्रस्तावित जलजिवन मिशन योजनेकरीता घेतलेल्या १) ग्रामसभा ठराव, २) भुजल सर्वेक्षण दाखला, ३) ग्राम पाणी पुरवठा समिती बैठक या बाबतची सखोल चौकशी होवून प्रस्तावित जलजिवन योजना स्थगित करून वरकुटे खुर्द पाझर तलावातून योजना राबवणेबाबतचा निर्णय व्हावा व शासन निधीचा अपव्यय टाळावा अशा आशयाचे पत्र नुकतेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या पत्रांवरबबन शेंडे ( मा. ग्रामपंचायत सदस्य),नवनाथ ठवरे पाटील (मा. ग्रामपंचायत सदस्य),अस्लम भाई मुलाणी (मा.चेअरमन.अध्यक्ष यात्रा कमिटी),बिटू श्रीपती शेंडे (मा. ग्रामपंचायत सदस्य),बबन क्षिरसागर (मा.चेअरमन वरकुटे खुर्द वि. का. सेवा. सोसायटी),मारूती शेंडे,कुंडलिक ठवरे( मा. चेअरमन),नितीन शेंडे (मा.उपसरपंच ग्रामपंचायत वरकुटे खुर्द),शंकर शेंडे (मा.चेअरमन),पांडूरंग शेंडे (मा.चेअरमन),बबन भोंगळे,दिपक पवार,संभाजी पवार,मिलिंद पवार या लोकांच्या सह्या निशी निवेदन अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना देण्यात आले आहे.आता याबाबत पुढील निर्णय संबंधित वरिष्ठ अधिकारी घेणार का? व शासनाचा निधी वाचवणार का? याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here