शेटफळ हवेलीचा कायापालट..!तब्बल २५ कोटी ८ लक्ष रुपयांचा एकूण निधी..आ.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज होणार भूमिपूजन व उद्घाटन.

इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावाला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत गावाचा कायापालट करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशस्वी झालेली दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला वेगवेगळ्या कारणांसाठी भरघोस असा निधी मिळत काही कामे पूर्ण झालेली आहेत तर काही कामे अंतिम टप्प्यात आलेली असून रस्ते,गटारी व सुशोभीकरण यामुळे गावाचा कायापालट झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालेला आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून भरघोस निधी देत शेटफळकरांची मने जिंकण्यात दत्तात्रय भरणे यशस्वी झालेले आहेत.


विशेष बाब म्हणजे शेटफळ हवेली ते बावडा (बोकडदरा ते शेटफळ हवेली)हा रस्ता हरदारीचा व दोन मुख्य गावांना जोडणारा रस्ता भारत देश स्वतंत्र झाल्यापासून डांबरीकरणापासून वंचित राहिला होता आता या सुद्धा रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे गावकरी आनंदीत आहेत. व या “शापित” रस्त्यापासून आपली सुटका होईल अशाच गावकऱ्यांचा अपेक्षा आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी याच गावात चारही बाजूंनी येणाऱ्या रस्त्याची अवस्था ही दयनीय होती. परंतु बावडा रस्ता सोडला तर सर्व बाजूंचे रस्ते आता अद्यावत होऊन दळणवळण सोपे झाले आहे.



आज शनिवारी 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता याच गावामध्ये विविध कामांचे उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे या गावात जाहीर सभाही होणार आहे आणि या जाहीर सभेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे काय बोलणार?याकडे सर्व पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. सद्यस्थितीत खालील प्रमाणे निधीचे नियोजन झालेले आहे व माध्यमातून कामे प्रगतीपथावर आहेत.



शेटफळ हवेली ते बावडा रस्ता (6 कोटी 8 लक्ष )
वडापुरी ते शेटफळ हवेली ते लाखेवाडी रस्ता (17 कोटी)
शेटफळ हवेली (तळेवाडी रस्ता) (20 लाख)
शेटफळ हवेली गारपिर (सावंत वस्ती रस्ता) ( 20 लाख)
शेटफळ हवेली रानमळा रस्ता (7 लाख)
शेटफळ हवेली जगताप मळा रस्ता (7 लाख)
शेटफळ हवेली सुतार वस्ती अंतर्गत रस्ता (10 लाख)
तळेवाडी भोसले वस्ती अंतर्गत रस्ते व हायमास्ट दिवे (15 लाख)
शेटफळ हवेली गावअंतर्गत बंदिस्त गटारी (10 लाख)
शेटफळ हवेली आंबेडकर उद्यान (20 लाख)
आंबेडकर नगर चव्हाण वस्ती अंतर्गत रस्ते व हायमास्ट (20 लाख)
शेटफळ हवेली भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण (10 लाख)
संत बाळूमामा मंदिर (निरगुडेवस्ती) सभा मंडप ( 15 लाख)
अंगणवाडी इमारत शेटफळ हवेली (11 लाख )
माध्यमिक विध्यालय शे. हवेली इमारती साठी (15 लाख)
शेटफळ हवेली स्मशाण भूमी सुशोभीकरण ( 20 लाख)



तरी या आज होणाऱ्या उद्घाटन समारंभ व उद्घाटन नंतरच्या सभेस सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे गावचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ,सरपंच रुपाली पवार,ग्रामपंचायत सदस्य महेश नरबट,माऊली निंबाळकर,संदीप चव्हाण,वर्षराणी चव्हाण,अस्लेशा शिंदे,ताई निकम,बानू मुलाणी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here