इंदापूर: दौंड येथील खाटीक समाजातील भगिनीची छेडछाड करुन मारहाण केल्याच्या निषेधार्थ तसेच घोलप व जमदाडे रा. दौंड, जि. पुणे या दोन कुटूंबियांना मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन गाव सोडून जाण्यास धमकी देण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आज दि.22 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी इंदापूरमध्ये सर्व खाटीक समाज प्रथमच रस्त्यावर उतरला होता.समस्त हिंदू खाटीक समाज इंदापूर शहर यांच्या वतीने शहरातून मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम खाटीक गल्ली येथे शहरातील सर्व समाज एकत्र येऊन झालेल्या घटनेविषयी निषेध व्यक्त करण्यात आला. सकाळी 10.30 वाजता खाटीक गल्लीतून सुरू झालेला हा मोर्चा कांबळे गल्लीतून हायवे मार्गे तहसीलदार ऑफिसला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पोहोचला होता.
दौड येथील पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या माजी नगराध्यक्ष बादशहाभाई शेख यांचेसह ८ जणांवर अँट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचा विनयभंग केला म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या तीन जणांना तलवार, कोयते घेऊन मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे. या कारणावरून दौंड माजी नगराध्यक्ष बादशहाभाई शेख, ईलास इस्माईल शेख, राशिद इस्माईल शेख, आरबाज सय्यद, वाहिद खान, जुम्मा शेख, वसिम शेख, जिलानी शेख व इतर १० ते १२ जणांवर दौंड पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अधिनियम ३(१) नुसार अँट्रॉसिटी आणि मारहाणीचा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे.सबंधित गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी इंदापूर शहर हिंदू खाटीक समाजाच्या वतीने या निवेदनाद्वारे विनंती नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी समस्त खाटीक समाजाने शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मूक मोर्चाचे कौतुक केले व आपल्या भावना शासन दरबारी पोहोचवण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत असा दिलासा दिला.एकूणच इंदापूर शहरांमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने खाटीक समाज एकत्र आलेला पाहायला मिळाला.
Home Uncategorized शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चा काढत दौंडमधील छेडछाड व मारहाण प्रकरणाचा इंदापूर शहरातील...