शिव फाउंडेशन भिगवण यांच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिर मदनवाडी ता. इंदापूर येथे आयोजित करण्यात आले.
भिगवण: भारत भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रविण बडे यांचे प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने व मातोश्री प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जर्मन टेक्नॉलॉजी मशीन द्वारे पूर्ण मोफत चेकअप व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले या शिबिरात गावातील सुमारे 153 जणांनी जर्मन टेक्नॉलॉजी मशीन द्वारे आपली तपासणी करून घेतली व या शिबिरास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असे शिव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी सांगितले,या शिबिरातून आपले शरीर व्याधीमुक्त राहण्यास मदत होईल असे आरोग्य सल्लागार धनंजय पिसाळ यांनी सांगितले.या आरोग्य शिबिरास माजी सहकार मंत्री मा.हर्षवर्धन पाटील साहेब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या,या कार्यक्रमास मारुती वणवे, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव,विश्वास देवकाते, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, भिगवणचे सरपंच तानाजी वायसे, कुंडलिक बंडगर, तेजस देवकाते यांच्यासह रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे,प्रवीण वाघ, सचिन बोगावत,संजय चौधरी,डॉ.संकेत मोरे,डॉ.अमोल खानावरे,डॉ.मृदुला जगताप,औदुंबर हुलगे, प्रदीप ताटे,कमलेश गांधी,अलताफ शेख, योगेश चव्हाण,राहुल गुंदेचा यांनी भेट दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यास आरोग्य सल्लागार किशोर शिंदे, डॉ.परशुराम तळेकर, डॉ.गोरक्षनाथ चौधरी तसेच शिव फाऊंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर,दीनानाथ मारने,अकबर तांबोळी,निलेश गायकवाड,अक्षय बंडगर,आकाश वनवे,माऊली मारकड,प्रवीण सलगर व मातोश्री प्रतिष्ठानचे विकास ढवळे, शुभम ढवळे, गौरव ढवळे, अविनाश ढवळे यांनी मोलाची मदत केली.