इंदापूर व शिरूर ता.प्रतिनिधी सचिन शिंदे
शिरूर:शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची गावामध्ये शिवाभिमान कला क्रीडा मंच ने विविध सार्वजनिक उपक्रम करत जोरदार शिवजयंती साजरी केली.छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.शिवाभिमान कला क्रीडा मंच यांनी खुप छान प्रकारे नियोजन केले होते. पिंपरी सेरोलाॅजिकल इन्टिप्युट ब्लड बकॅ,पिंपरी-चिंचवड याच्या साह्याने यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. ग्रामस्थनी रक्तदान दान शिबीर ला चांगला प्रतिसाद दिला. शिवज्योत शिवनेरी वरून शिवभक्तांनी आणत मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.निलेशजी लंके (आमदार,पारनेर विधानसभा) व मानसिंग भैया पाचुंदकरपाटील (अध्यक्ष रा.काॅ.शिरूर आंबेगाव विधानसभा) उपस्थित होते.शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.हाच उद्देश पोहचण्यासाठी शिवाभिमान मंच ने ही दौलत महाराष्ट्राची हा कार्यक्रम चे आयोजन केले होते. या वेळी गुणवंत विद्यार्थी,कोराना योद्धा, आजी माजी सैनिक, पोलिस मिञ,सामाजिक कार्य नवज्योत फाउंडेशन यांचे गौरव चिन्ह देत सत्कार करण्यात आले.महाप्रसाद चे देखील छान प्रकारे नियोजन करत चिंचोली मोराची ग्रामस्थ यांनी खुप छान प्रकारे प्रतिसाद दिला.