तळागाळातून निर्माण झालेला शिवसेना पक्ष आणि याच पक्षाचे झालेले अभूतपूर्व बंडाळीनंतर नेत्यांची कोलांटउड्या इकडून तिकडे सुरु असल्या, तरी निष्ठावंत शिवसैनिक मात्र हे उघड्या डोळ्याने पाहत आहे.मातोश्रीवरील शब्द शिरसावंद्य मानून जीवाची सुद्धा काळजी न करणारा शिवसैनिक शिवसेनेत चाललेल्या घडामोडीत चांगलाच भेदरून गेला आहे. गेलेल्या अनेक सत्तापिपासू नेत्यांवर ते संतापही व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नेते गोळा करण्यासाठी जाळे फेकले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांशी बैठकांचा धडाका लावला आहे. ते सातत्याने दिलासा देत आहेत.उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. स्वत:च्या रक्ताने लिहिलेलं पत्र त्या शिवसैनिकाने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना दिलं आहे. त्यामुळे या शिवसैनिकाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Home Uncategorized शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंचं समर्थन करीत दिला बिनशर्त पाठिंबा..