इंदापूर || मुंबईतील शिवसेनेचा ढाण्या वाघ दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून अवघ्या महाराष्ट्रात सद्या तो हाऊसफुल्ल चालला आहे.दिवंगत आनंद दिघे यांनी ठाणे जिल्हयापासून केलेली शिवसेनेची सुरुवात,वाढ त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास हा या सिनेमात अगदी उत्तम पद्धतीने दाखवण्यात आला आहे.आपल्या इंदापूर तालुक्यातील जनतेसही आनंद दिघेंचा जीवनपट माहिती व्हावा या उद्देशाने तालुकाप्रमुख नितीन शिंदे व शहरप्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी इंदापूरकरांसाठी शिवसेना मार्फत मोफत सिनेमा दाखवण्याचे आयोजन केले आणि 6 ते 9 या कालावधीतील आख्खा सिनेमा हॉल बुक केला. सिनेमा चालू होण्याआधी इंदापूर शहरातून मोठ्या प्रमाणात रॅली निघाली आणि जयघोष करत ही रॅली थिएटर मध्ये पोहोचली.इंदापूरकरांनीही यास प्रतिसाद दिला आणि सिनेमा हॉल गच्च भरला,जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर आनंद दिघे अमर रहे या घोषणांनी अवघे केशर थिएटर घुमघुमले. प्रसाद ओक यांनी साकारलेली हुबेहूब आनंद दिघे यांची छबी पाहताच सर्व शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून एक प्रकारे त्यांच्या अभिनयाची दाद दिली.याप्रसंगी विशालदादा बोंद्रे,अरुण पवार,अवधूत पाटील,सचिन इंगळे,बालाजी पाटील,अशोक देवकर,आप्पा डोंगरे,संतोष क्षीरसागर,संजय खंडागळे,देवा मगर,अविनाश खंडागळे तसेच इंदापूर तालुका शिवसेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Home Uncategorized शिवसेनेने इंदापूरकरांना दाखविला धर्मवीर सिनेमा.केशर सिनेमा हॉल हाऊसफुल्लसह भगव्या वातावरणात अनुभवले धर्मवीर...