शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या कार्यकर्त्यांनी मला पक्ष निष्ठा शिकवू नये- जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांची सिंहगर्जना.

शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या कार्यकर्त्यांनी मला पक्ष निष्ठा शिकवू नये अशी डरकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी केली.सन1986 ते 2022 पासुन मी शिवसेना या संघटनेचे काम करत आहे . हे फक्त शिवसेना या चार अक्षरासाठी ज्यांनी काम केले व पद असो, नसो पदावर नेमणूक होऊ अथवा पदावरून दूर करो, कधी ही शिवसेनेची नाळ आम्ही सोडली नाही.जे आज आरोप करत आहेत त्याचे बद्दल मला वाटतं ते फक्त निवडणूक उमेदवारी साठी शिवसेनेत आले आहेत . व मागील नगराध्यक्ष निवडणूक मध्ये 22000 पैकी 600 मते ही ते मिळवू शकले नाही व गेल्या विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला होता त्यामुळे गद्दारांची पक्षातून हकालपट्टी केली ,त्यांनी विनाकारण पक्षात पद आणि गटबाजी करून पक्षशिस्त मोडू नये असे परखड मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी व्यक्त केले आहे. समाजसेवा करताना मागील 44 वर्ष एकाच पक्षात कायम राहणारे शिवसैनिक आणि निवडणूक साठी पक्षात येऊन परत गद्दारी करणारे बाजारबुणगे यांनी हा फरक आधी ओळखावा,आणि मग शिवसेनेसारख्या संघटनेत आपले स्थान उंबर्याच्या बाहेर आहे हे जाणून घ्यावे.
पक्षात पद बदल हे कालांतराने होत असतात आणि नवीन नेमणूक करताना जे आधीपासूनच शिवसेनेत आहे त्याचीच वर्णी लागते आणि शिवसैनिक त्याचा स्वीकार ही करतात हा शिवसेनेचा इतिहास आहे. या साठी पक्षशिस्त मोडून व्यक्तिगत टीका करनारे हे किती निष्टावंत आहेत याचे भान त्यांनी ठेवावे ,सुरूवात शिवसेनेत आणि शेवट ही शिवसेनेत हे ज्यांना जमते त्यांनीच हे बोलावे कोणाच्या तरी भाडोत्री उसने अवसान आणून विनाकारण संघटनेत गटबाजी करू नये, शिवसैनिक त्याला भीक घालणार नाहीत अशी डरकाळी फोडून सिंहगर्जना त्यांनी आज केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here