अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील ओबीसी समाजाचे युवा नेतृत्व पै.अशोक बाबू देवकर यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पुणे जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे.इंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट)माध्यमातून इंदापूर तालुक्यात अनेक कार्यक्रम,आंदोलने यशस्वीरित्या राबवणारा खांदा शिवसैनिक म्हणून पै.अशोक देवकर यांची ओळख आहे.सध्या अशोक देवकर हे शिवसेनेच्या शहराध्यक्षपदी काम करत आहेत हे पद कायम ठेऊन ओबीसी समाजाच्या अनेक प्रश्नांवर सुद्धा ते काम करत असतात. काल दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांच्या सहीने तसेच पुणे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांच्या सहीने पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पै.अशोक देवकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.काल पै.अशोक देवकर यांना छगनराव भुजबळ यांनी बोलून त्यांचा सत्कार करण्यात आला.ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील इंदापुरात झालेल्या महाएल्गार मोर्चा यशस्वी करण्यामध्ये पै.अशोक देवकर खारीचा वाटा होता त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि याचीच दखल घेऊन त्यांची पुणे जिल्हा संघटक पदी निवड झाली आहे असे म्हटले जाते.
या निवडीनंतर अशोक देवकर म्हणाले की,”ओबीसीचा संघर्ष योद्धा छगन भुजबळ यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासास पात्र राहून मी सदैव ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढत राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ, जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजाचा प्रश्न हाती घेऊन समाजकार्य करत राहील” असे अशोक देवकर म्हणाले.पै.अशोक देवकर यांच्या निवडीबद्दल इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून त्यांचा मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा देत आहेत एकंदरीतच इंदापूर तालुक्यातील संघटक पदी निवड झाल्यानंतर ओबीसी युवा नेता म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिले जात आहे.
Home Uncategorized शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष पै.अशोक देवकर यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता...