इंदापूर: कोरोना परिस्थितीनंतर आज आनंदाने दिवाळी साजरी करताना दिवाळीपासून कोणीही वंचित राहू नये या उद्देशाने शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्या संकल्पनेतून दीपावलीनिमित्त श्रावण बाळ आश्रम शाळा इंदापूर या ठिकाणी दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. यावेळी बाल चिमुकल्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना मध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व बांधवांना व भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या परिवाराला दिवाळीचे फराळ वाटपही करण्यात आले
खरंतर दर दिवाळीला शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे हे वेगवेगळ्या संकल्पना राबवत असतात. गेल्यावर्षी इंदापूर तालुक्यात 16000 दिवाळी किट वाटप करून नितीन शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपली होती व यावेळीही हा नवीन उपक्रम राबवून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
यावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने शिवसेना तालुका प्रमुख श्री नितिन शिंदे, शहर प्रमुख महादेव सोमवशी,राजनागरी पतसंस्था चे चेअरमन सतिश बाबर सर,तालुका समनव्यक अरुण पवार, उपतालुका प्रमुख सुदर्शन साखरे,विभाग प्रमुख अंकुश गलांडे, माथाडी कामगार चे सरचिटणीस राजू शेवाळे, उपविभाग प्रमुख हेमंत भोसले, उपशहर प्रमुख संजय खंडागळे उपशहर प्रमुख बालाजी पाटील,गोरख कदम,महिला आघाडी च्या पुष्पा घोरपडे ,शेटफळ हवेली शाखा प्रमुख अमोल शिंदे, दिपक शिंदे, सचिन पुंडे , कालठण शाखाप्रमुख शामराव लांवड,गोविंद पाडुळे,रवि पाडुळे, दादा मुलाणी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.