शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनानिमित्त व्याख्यान व स्त्री शक्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.

शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतिने महिला दिनानिमित्त व्याख्यान व स्त्री शक्ती सन्मान सोहळा आयोजितविविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळ उत्साहात संपन्न झाला.
दि.14 मार्च रोजी शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रतिष्ठानचे यंदाचे तिसरे वर्ष आहे महिला दिन साजरा करण्याचे.मागिल दोन वर्षी होम मिनीस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.तसेच या वर्षी व्याख्याना चे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अंकिता शहा,नगराध्यक्षा यांनी विशेष सहकार्य केले.या महिला दिनानिमीत्त श्री.सोपान कनेरकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.हा कार्यक्रम शिवशंभो प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पोपट पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.तसेच या प्रसंगी अनुराधा गारटकर,अलका ताटे,उमा इंगोले,मायाताई विंचू,अनिता खरात,स्मिता पवार,उज्वला राऊत,सायर पठाण व कला क्षेत्र,क्रिडा क्षेत्र,सामजिक क्षेत्र,राजकिय क्षेत्र,वैदकीय क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्र या विविध क्षेत्रातील सर्व महिला उपस्थित होत्या.
तसेच हा कार्यक्रम पार पडण्यासाठी शिवशंभो प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी कठिण परिश्रम घेतले. तसेच आभार शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.शुभम पोपट पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here