निमगाव केतकी:शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, त्याचा आनंद इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने निमगाव केतकी गावामध्ये साखर फुटाणे वाटून तोफा उडवून फटाक्यांची आताशबाजी करून आनंद उत्सव साजरा केला , शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेला दसरा मेळावा कोविड चा कालावधी वगळता अखंडितपणे शिवतीर्थावर पार पडत होता. एकच नेता एकच व्यासपीठ आणि असंख्य लाखो शिवसैनिक हे समीकरण महाराष्ट्राने बघितले परंतु सध्या शिवसेनेमध्ये काही आमदारांनी गद्दारी केल्यामुळे फूट पडली आहे ,त्यामुळे शिवसेनेला दसरा मेळाव्यामध्ये अडकाटी करायची म्हणून काही ढोंगी लबाड स्वार्थी नेत्यांनी आम्ही खरे शिवसैनिक म्हणून समजणारे शिंदे गट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माननीय उच्च न्यायालयाने चांगली चांगलीच चपराक दिलेली दिसून येते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवतीर्थावरती विचारांचे सोने लुटण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होणार आहे त्यावेळेस आपणही उपस्थित रहा असे आवाहन शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अँड. नितीन कदम यांनी केले सदर कार्यक्रमा वेळी शिवसेनेचे निमगाव केतकीचा ढाण्या वाघ बबनराव खराडे उप तालुकाप्रमुख रणजीत बारवकर ,संजय भोंग जगन्नाथ आदलिंग ,अमोल जाधव ,श्याम शेंडे, प्रकाश जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. यावर्षीचा दसरा मेळावा ऐतिहासिक असेल आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवणार असेल अशी आशा अँड. नितीन कदम यांनी व्यक्त केली.
Home Uncategorized शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर निमगाव केतकीत साखर फुटाणे वाटप करून...